Kolhapur: काळम्मावाडी धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, तरीही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 03:51 PM2024-07-13T15:51:09+5:302024-07-13T15:51:31+5:30

सोळांकुर : गेले काही दिवस संततधार पडत असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणात ३५.६९ टक्के म्हणजे ९.६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ...

Kalammawadi dam has more water than last year, but farmers face water shortage | Kolhapur: काळम्मावाडी धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, तरीही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

Kolhapur: काळम्मावाडी धरणात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, तरीही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

सोळांकुर : गेले काही दिवस संततधार पडत असलेल्या पावसामुळे काळम्मावाडी धरणात ३५.६९ टक्के म्हणजे ९.६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास या वर्षी धरण लवकर भरण्याची शक्यता आहे.

या वर्षी धरण परिसरात आजअखेर ३७ मिलिमीटर पाऊस झाला असून एकूण १२६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर गतवर्षी या वेळेस धरण परिसरात १२ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता आणि ५८५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीपेक्षा या वर्षी धरण परिसरात ६८० मिलिमीटर पाऊस अधिक झाला.

यावेळी धरणात आज अखेर ३५.६९ टक्के म्हणजे ९.६ टीएमसी इतका पाणीसाठा तर गतवर्षी ३.९६ टीएमसी म्हणजेच १५.६० टक्के इतका पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा आज धरणात २०.९ टक्के पाणीसाठा अधिक आहे. वेळेत पाऊस झाला तर धरण लवकर भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर्षीही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

धरणाच्या मुख्य भिंतीच्या गळतीसाठीची निविदा मंजूर न झाल्याने या वर्षीही धरणाच्या सुरक्षिततेसाठी गतवर्षी एवढाच म्हणजे २० टीएमसी पाणीसाठा धरणात केला जाणार आहे. जवळपास पाच टीएमसी पाणीसाठा कमी राहिल्यास या वर्षीही शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे
 

Web Title: Kalammawadi dam has more water than last year, but farmers face water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.