काळम्मावाडी धरणग्रस्तांचे उपोषण, एकाची प्रकृती खालावली, आंदोलन मागे घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 07:23 PM2021-03-05T19:23:02+5:302021-03-05T19:25:54+5:30
Dam collector kolhapur- कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या काळम्मावाडी धरणग्रस्तांमधील एकनाथ चौगुले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या धरणग्रस्तांसोबत १० तारखेला बैठक ठेवली असून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र धरणग्रस्तांनी त्यास नकार दिला.
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या काळम्मावाडी धरणग्रस्तांमधील एकनाथ चौगुले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या धरणग्रस्तांसोबत १० तारखेला बैठक ठेवली असून उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र धरणग्रस्तांनी त्यास नकार दिला.
काळम्मावाडी धरणग्रस्तांचे योग्यरित्या पुर्नवसन झालेले नाही या कारणास्तव गुरुवारपासून काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने गुरुवारपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. धरणग्रस्तांपैकी २० जण सध्या उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी यातील एकनाथ चौगुले यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होवू लागल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.