Kolhapur: काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला कुर्डूमध्ये गळती, लाखो लिटर पाणी वाया 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 03:27 PM2023-11-11T15:27:47+5:302023-11-11T16:05:36+5:30

पाणी पूजन समारंभानंतर काही तासातच मोठ्या प्रमाणात गळती

Kalammawadi direct pipe project leaks between Kurdu, lakhs of liters of water wasted | Kolhapur: काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला कुर्डूमध्ये गळती, लाखो लिटर पाणी वाया 

Kolhapur: काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेला कुर्डूमध्ये गळती, लाखो लिटर पाणी वाया 

सडोली (खालसा): कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी काळमवाडी- कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पूजन समारंभ होऊन काही तासातच हळदी कुर्डू (ता.करवीर) दरम्यानच्या ओढ्यानजीक पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले पाण्याचे ५०ते ६० फूट उंचीचे फवारे हवेत उडत होते. यामुळे शेजारी असणाऱ्या ऊस शेतीचे नुकसान झाले. 

काल, शुक्रवारी रात्री काळम्मावाडी - कोल्हापूर थेट पाईप लाईनचे पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोचून काही तासातच उलटल्यानंतर हळदी कुर्डू तालुका करवीर येथील पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागली. सकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. गळती थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हॉल बंद करून देखील बरेच तास हवेत पाण्याचे उंच फवारे सुरू होते. गळती ओढ्यालगत झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळले. ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले होते. यामुळे गळतीची तीव्रता लक्षात येत होती.
 
गळती दुरुस्तीसाठी दुपारी यंत्रणा सक्रिय झाली होती. पाण्याचा दाब कमी होण्यासाठी गळती जवळील हॉलमधून ओढ्यात हजारो लिटर पाणी सोडण्यात ओढ्यात सोडून पाईप निकामी करण्यात आली. व दुरुस्ती करण्याचे काम दुपारनंतर सुरू करण्यात आले. हे पाणी नजीकच्या शेतात गेल्यामुळे बाजीराव चौगले व अन्य शेतकऱ्यांचे ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच कुर्डू माळावरती व देवाळे येथील शेजारी गळती लागली आहेत. गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. 

Web Title: Kalammawadi direct pipe project leaks between Kurdu, lakhs of liters of water wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.