काळभैरव जयंती सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:23 AM2020-12-08T04:23:07+5:302020-12-08T04:23:07+5:30
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मकाळ सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. मंगळवारी पहाटे चार ...
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मकाळ सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला.
मंगळवारी पहाटे चार वाजता घंटानादाने श्री काळभैरव जयंती सोहळ्यास प्रारंभ झाला. पाद्यपूजा, काकड आरती, लघु रुद्र अभिषेक, पोषाख व अलंकार महापूजा, पुण्यहवाचन , मातृकापूजन '''' नवग्रह पूजन, क्षेत्रपाल पूजन, होमहवन विधी झाले. पुरोहित यांनी मंत्र पठण केले. दुपारी २ ते ५ला ज्योतिर्लिंग भजनी मंडळ ‘डवरी गीत’ कार्यक्रम झाला. सायंकाळी ६.४८ वाजता श्री काळभैरव जन्मकाळ सोहळा मंदिरात पार पडला. यावेळी श्रींचे पुजारी, मुख्य पुजारी यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. भाविकांनी गुलाल, पुष्पवृष्टी करून चांगभलंचा गजर केला. काळभैरव पाळणा गीत म्हटले. यावेळी गावकरी, ग्रामस्थ, पुजारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्र झाला. गुलाल, फुलांची उधळण केली. काळभैरवाची भैरवरुपात उत्सवपूजा बांधण्यात आली होती. फुलांची आकर्षक सजावट केली होती. जोतिबाची चतुर्भुज रूपात पूजा बांधण्यात आली होती. काळभैरव नावानं चांगभलंचा गजर झाला. सुंठवडा वाटप केला. फटाक्यांची आतषबाजी करून सोहळ्याची सांगता झाली. प्रसाद व सुगंधी दूध वाटप केले. भावगीत व भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला.
फोटो आहे .
कॅप्सन : १) काळभैरव जयंतीनिमित्त भैरव रूपात बांधण्यात आलेली श्री. काळभैरवांची उत्सव महापूजा.