मांगूर येथील १०५ वर्षीय कमलादेवी माने यांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:52+5:302021-06-04T04:19:52+5:30

कमलादेवी माने यांना गेल्या १५ दिवसांपूर्वी अशक्तपणासह तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात ...

Kamaladevi Mane, 105, of Mangur defeated Korona | मांगूर येथील १०५ वर्षीय कमलादेवी माने यांची कोरोनावर मात

मांगूर येथील १०५ वर्षीय कमलादेवी माने यांची कोरोनावर मात

Next

कमलादेवी माने यांना गेल्या १५ दिवसांपूर्वी अशक्तपणासह तब्येतीचा किरकोळ त्रास जाणवू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यावर कमलादेवी यांच्यावर डॉ. निरंजन राठोड आणि त्यांच्या सहकारी यांनी उपचार सुरू केले. या उपचारांना प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उत्तम प्रतिसाद दिल्याने त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आणि त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना गुरुवारी डॉ. राठोड यांनी डिस्चार्ज दिला. यावेळी डॉ. सुशांत गुणे, मोहन माने, माधवी माने, जयेश ओसवाल आदी उपस्थित होते.

चौकट

रोज वृत्तपत्र वाचन, व्यायाम

कमलादेवी यांची स्मरणशक्ती चांगली आहे. जुन्या काळातील प्लेगसह इतर साथ रोगाबाबतच्या आठवणी त्या स्पष्टपणे सांगतात. त्या रोज वृत्तपत्रांचे वाचन करतात. चालण्याचाही व्यायाम करतात. भाकरी, मुगाची उसळ, भात असा त्यांचा शाकाहारी आहार आहे. चार मुली, तीन मुले, १६ नातवंडे, २१ परतवंडे असा त्यांचा परिवार आहे.

प्रतिक्रिया

आई आमच्या कुटुंबाची आधारवड आहे. वय वर्षे १०५ असतानाही ती कोरोनाला घाबरली नाही. तिने वैद्यकीय उपचारांना योग्य प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करता येते असा संदेश तिने दिला आहे.

-मोहनराव माने.

फोटो (०३०६२०२१-कोल-कमलादेवी माने (मांगूर) : मांगूर (ता. चिकोडी) येथील १०५ वर्षीय कमलादेवी माने यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. कोल्हापुरातील खासगी दवाखान्यातून गुरुवारी त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जयेश ओसवाल, निरंजन राठोड, सुशांत गुणे, माधवी माने, मोहन माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Kamaladevi Mane, 105, of Mangur defeated Korona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.