कणबरकर अनंतात विलीन

By admin | Published: April 15, 2015 12:42 AM2015-04-15T00:42:14+5:302015-04-15T00:42:14+5:30

पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यविधी : विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

Kanabkar Ananta merged | कणबरकर अनंतात विलीन

कणबरकर अनंतात विलीन

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्ञानतपस्वी प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकराला पंचगंगा स्मशानभूमीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले. उपस्थितांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी अंतिम निरोप दिला. आज, बुधवारी सकाळी नऊला रक्षाविसर्जन होणार आहे.
डॉ. कणबरकर यांचे भोगावती (ता. करवीर) येथे त्यांचे चिरंजीव डॉ. अरुण यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी नाळे कॉलनीतील ‘शालिनी’ निवासस्थानी आणले. इथे माजी आमदार बाबूराव धारवाडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, माजी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, व्ही. टी. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. डी. के. गायकवाड, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, डॉ. एस. ए. बोजगर, सुधाकर मानकर, आदींनी अंत्यदर्शन घेतले. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी जावई डॉ. बा. प. साबळे, बाबासाहेब खोत, प्रकाश वागळे, नातू अभिषेक कणबरकर, ओंकार खोत आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, डॉ. रमेश जाधव, इंद्रजित सावंत, डॉ. क्रांतिकुमार पाटील, डॉ. डी. आर. मोरे, एन. व्ही. नलवडे, प्राचार्य टी. एस. पाटील, अरुण भोसले, एस. आर. यादव, भालबा विभूते, रमेश पोवार, चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अनिल चौगुले, नामदेव गावडे, किसन कुराडे, आदींनी अंत्यदर्शन घेतले.(प्रतिनिधी)


 

Web Title: Kanabkar Ananta merged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.