संचारबंदीत कांचनवाडीचा आठवडी बाजार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:24 AM2021-04-17T04:24:37+5:302021-04-17T04:24:37+5:30
म्हालसवडे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या संचारबंदीचा करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात पुरता फज्जा उडाला आहे. ...
म्हालसवडे : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेल्या संचारबंदीचा करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात पुरता फज्जा उडाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व व्यवसाय बंद असले तरीदेखील शुक्रवारचा कांचनवाडी येथील आठवडी बाजार आज सुरूच होता.
कांचनवाडी येथील आठवडी बाजारात व्यापारी व ग्राहकांनी गर्दी केली होती. या बाजारामधील काही अपवाद वगळता बऱ्याचशा लोकांच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता. जिल्हा प्रशासन व शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन करण्याकरिता या पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींनी स्थानिक व्यावसायिकांना सूचना देऊन व्यवसाय बंद करण्यास लावले आहेत. मात्र, या परिसरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. टेम्पो व इतर वाहनांमधून या पंचक्रोशीतील गावोगावी व्यापार करणारे व्यावसायिकही बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.
१६ कांचनवाडी संचारबंदी फेल
फोटो : कांचनवाडी (ता. करवीर) येथे शुक्रवारी संचारबंदीमध्ये भरलेला आठवडी बाजार.