गगनबावड्यातील निसर्ग संपदेला वृक्षतोडीचा शाप विकासाच्या नावाखाली कत्तल : पर्यावरण समतोल ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:23 AM2018-06-06T00:23:59+5:302018-06-06T00:23:59+5:30

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर

Kangaroo: Environmental balance is ruined in the name of curation of tree trunk | गगनबावड्यातील निसर्ग संपदेला वृक्षतोडीचा शाप विकासाच्या नावाखाली कत्तल : पर्यावरण समतोल ढासळतोय

गगनबावड्यातील निसर्ग संपदेला वृक्षतोडीचा शाप विकासाच्या नावाखाली कत्तल : पर्यावरण समतोल ढासळतोय

Next

साळवण : निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्यातील निसर्ग संपदेला विकासाच्या नावाखाली वृक्षतोडीचा शाप लागला असून अनेक जैवविविधतेने संपन्न असणारी ठिकाणे एकतर नष्ट झाली आहेत अथवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण ºहासामुळे निसर्गातील अनेक अन्नसाखळीतील दुवे निखळल्यामुळे अनेक अन्नसाखळ्या कमकुवत होऊन मौल्यवान वनस्पती व प्राणी नष्ट होऊन पर्यावरण ढासळत चालले आहे. तर जंगलतोड करून सपाटीकाण केल्यामुळे मुळचे जंगलातील पाणवठेच नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांनी पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्तीकडे वळवला आहे.

एकीकडे शतकोटी वृक्ष लागवट , झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा जीवन वाचवा, जल आहे तर कल आहे. अशा अनेकविध कार्यक्रमांवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते आहे. तर दुसरीकडे घनदाट जंगलावर बेदरकारपणे कुºहाड चालवत हजारो वर्षांपासून सळसळणारे जंगल विकासाच्या नावाखाली सपाट करून डोंगरच्या डोंगर उघडे-बोडके केले जात आहेत. गगनबावडा तालुका राजरोसपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे सपाट आणि उघडा बोडका होऊन रूक्ष होत चालला आहे.

तालुक्यात तामजाई, वळताई, कोदे, बोरबेट, अणदूर, गगनबावडा, पळसंबे अशी अनेक दुर्मीळ वनसंपदेने संपन्न व घनदाट झाडीने नटलेली ठीकाणे आहेत; पण, याकडे गर्भश्रीमंतांची नजर वळली आहे. तामजाईसारख्या घनदाट जंगलाच्या पठारावर शेकडो एकराचे सपाटीकरण करून कोट्यवधी रूपयांची जंगल संपत्ती डोळ्यादेखत नष्ट होताना वन खाते काय करते आहे. सामान्य शेतकऱ्याला आपल्या बांधावरचे एक झाड तोडताना नियम सांगणारे वन खाते अशा सपाटीकरणावेळी नियमात अर्थकारण शोधते काय ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे. असे सपाटीकरण तालुक्याच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणात होत आहे.

तालुक्या बाहेरुन आलेल्यांनी कवडीमोल किमतीने सर्व सामान्यांच्या जमिनी घेऊन मालकी हक्क प्रस्तापित केला व संह्यांद्रिच्या संवेदनशील पर्वत रांगांत हजारो वर्षांच्या जंगलावर अमानुषपणे कुºहाड चालवायला सुरुवात केली आहे. आधुनिक शेतीच्या नावाखाली शेकडो एकर जमिनीचे सपाटीकरण होत असताना त्याला विरोध न करता आपण मात्र ‘पर्यावरण वाचवा देश वाचवा’ अशा घोषणा देत ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ही प्रत्येक वर्षाला मोठ्या उत्साहात साजरा करतो. शतकोटी वृक्षयोजना राबवतो. याचा काय फायदा ? तालुक्यातील जंगल क्षेत्र मात्र वाढण्याऐवजी प्रत्येक वर्षाप्रमाणे कमी कमी होत जाते आहे याचे गम्य काय ? कागदोपत्री लाखो वृक्षांची लागवड करून अनुदानात अर्थ शोधण्यापेक्षा दररोज हजारो रूपयांची प्राप्ती असणारी मंडळी वृक्षांची कत्तल करुन अधुनिक शेतीच्या नावाखाली भाजीपाला पिकवत वर्षाला कांही हजार रूपयांसाठी शेती करून काय साध्य करतात हे शोधून यावर प्रकाश टाकला तर वेगळीच माहिती उजेडात येईल. मालकी हक्कातील जंगलावर आधुनिक वनशेती केली तर आर्थिक प्राप्तीबरोबत पर्यावरण संरक्षण होईल.

पाणवटे बंदिस्त : प्राणी मानवी वस्तीत
मालकी हक्काच्या नावाखाली जमिनी भोवती काटेरी तारेचे कुंपणे केल्याने प्राण्यांचे पाणवटे बंदिस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे.

वृक्षतोड व जमीन सपाटीकरणामुळे जंगलातील अनेक अन्नसाखळीतीत दुवे निखळले. त्यामुळे अनेक वनस्पती व प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर  जंगल तोडुन आधुनिक शेतीसाठी अनेकांनी केली अनुदानाची उचल

गगनबावडा तालुक्यातील तामजाई पठारावरील शेकडो एकर जमिनीवरील वृक्षांची कत्तल करून आधुनिक शेतीच्या नावाखाली सपाटीकरण करण्यात आले आहे.

Web Title: Kangaroo: Environmental balance is ruined in the name of curation of tree trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.