कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 07:54 PM2021-04-05T19:54:14+5:302021-04-05T20:04:12+5:30
CoronaVirus Kankavli Market Sindhudurg- कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .
कणकवली : कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .
कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने त्यामुळे विक्रेत्यांना लावता येणार नाहीत . इतर दुकाने जरी सुरू असली तरी आठवडा बाजाराच्या दिवशी ज्या पद्धतीने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते ती गर्दी रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे . त्याची काटेकोर अंमलबजावणी मंगळवारी केली जाणार आहे .
कोणीही नियम मोडलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.त्यामुळे जनतेने देखील आठवडा बाजारासाठी कणकवलीत गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले . तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी नियमांचे काटेकोर पालन नागरीकांनी करावे असेही आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे .