कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार उद्या बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:23 AM2021-03-19T04:23:52+5:302021-03-19T04:23:52+5:30

कोल्हापूर : सीमावासीय मराठी बांधवांवर बेळगावसह आसपासच्या गावात अन्याय होत आहे. याच्या निषेर्धात उद्या, शनिवारी शिवसेनेने कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार ...

Kannada traders will be closed tomorrow | कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार उद्या बंद राहणार

कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार उद्या बंद राहणार

Next

कोल्हापूर : सीमावासीय मराठी बांधवांवर बेळगावसह आसपासच्या गावात अन्याय होत आहे. याच्या निषेर्धात उद्या, शनिवारी शिवसेनेने कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद राहतील, असे आश्वासन चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजतर्फे देण्यात आले. यासंबंधी गुरुवारी चेंबर ऑफ काॅमर्सच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गेले काही दिवसांपासून सीमा भागातील मराठी बांधवांवर कर्नाटक पोलीस अन्याय करीत आहे. त्यात चार दिवसांपूर्वी बेळगावात मराठी बांधवांनी मराठी भाषेतून मोबाइल फोनवर स्टेट‌्स ठेवल्याबद्दल त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या सर्व अन्यायाविरोधात शिवसेनेने शनिवारी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजने शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या दरम्यान जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद राहतील, अशी ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, चेंबर ऑफ काॅमर्सचे संजय शेटे,माजी अध्यक्ष आनंद माने, शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सूर्यकांत कापसे, महेश शानभाग, उमेश प्रभू, प्रशांत शिंदे, अनिल धडाम, जयेश ओसवाल,आदी मान्यवर उपस्थित होते.

हाॅटेल मालक संघाचाही पाठिंबा

या आंदोलनास कोल्हापूर जिल्हा हाॅटेल मालक संघानेही पाठिंबा दिल्याची माहिती अध्यक्ष उज्वल नागेशकर व माजी अध्यक्ष आनंद माने यांनी दिली. या पत्रकावर उपाध्यक्ष सचिन शानभाग,सचिव सिद्धार्थ लाटकर, सुशांत पै, के.व्ही.नायक, यांच्या सह्या आहेत.

फोटो : १८०३२०२१-कोल-शिवसेना

आेळी : सीमावासीय मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शनिवारी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून चेंबर ऑफ काॅमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजने कन्नड व्यावसायिकांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. पाठिंब्याचे पत्र चेंबरतर्फे शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी आनंद माने, विजय देवणे, जयेश ओसवाल, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Kannada traders will be closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.