'कनवा' तर्फे वि. स. खांडेकर व्याख्यानमाला रविवारपासून
By admin | Published: January 6, 2015 11:01 PM2015-01-06T23:01:58+5:302015-01-07T00:07:05+5:30
३४ वर्षांची परंपरा : मान्यवरांचा सहभाग
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिरच्यावतीने ११ ते १८ जानेवारीदरम्यान वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोशी व कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, संस्थेच्या विश्वनाथ पार्वती गोखले सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून महापौर तृप्ती माळवी उपस्थित असतील. उद्घाटनानंतर ‘भगवद्गीता आणि आमचे आचरण’ या विषयावर रामभाऊ डिंबाळे हे विवेचन करतील. मराठी सारस्वतांचे मानदंड असलेल्या वि. स. खांडेकर यांच्या नावे गेली ३४ वर्षे ही व्याख्यानमाला अव्याहतपणे सुरू आहे. या व्याख्यानमालेद्वारे करवीर नगरीतील रसिक , साहित्यप्रेमींना उत्तमोत्तम लेखक, जाणकार साहित्यिकांचे विचार ऐकण्याची संधी मिळते, तरी रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नंदकुमार मराठे, केदार मुनिश्वर, अभिजित भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्याख्यानमालेचे
वेळापत्रक पुढीलप्रमाणे
११ जानेवारी : रामभाऊ डिंबाळे : भगवद्गीता आणि आमचे आचरण
१२ जानेवारी : भगवान चिले : शिवछत्रपती आणि गडकोट
१३ जानेवारी : मृदुला जोशी : पुस्तक यात्रा
१४ जानेवारी : डॉ. प्रकाश पवार : भारतातील बदलते राजकारण
१५ जानेवारी : काशीनाथ देवधर : भारतीय क्षेपणास्त्र
१६ जानेवारी : प्रकाश बोकील : चरित्र वाङ्मयाचे संस्कारमूल्य
१७ जानेवारी : डॉ. भूषण शुक्ल : पालकत्व आधुनिक जगाचे
१८ जानेवारी : डॉ. अरुणा ढेरे : तीन रमाबाई .