कोल्हापूर : ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, अंबरीश घाटगे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 05:39 PM2019-01-15T17:39:22+5:302019-01-15T17:40:33+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे.
कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या वतीने विद्याभवन येथे आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेमध्ये घाटगे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.
घाटगे म्हणाले, माध्यमिक शाळांनी योग्य असे प्रस्ताव तयार करावेत. ते परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अमन मित्तल म्हणाले, विद्यार्थ्याला नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे, यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याची संधी त्याला मिळायला हवी. अटल टिंकरिंग लॅबमुळे ते शक्य होणार असल्याने सर्व शाळांनी यासाठी प्रयत्न करावेत.
प्रारंभी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी स्वागत केले. यावेळी प्रभारी उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे, संघाचे उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, सहसचिव एस. एम. पासले, खजिनदार नंदकुमार गाडेकर, लोकल आॅडिटर मिलिंद पांगिरेकर, अशोक हुबळे, एस. वाय. पाटील, शिवाजीराव कोरवी, ए. एम. अन्सारी, पी. जी. पोवार, श्रीकांत पाटील, अजित रणदिवे, सखाराम चौकेकर, सुरेश उगारे, संपत कळके, जे. के. पाटील, रवींद्र मोरे उपस्थित होते.