कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 06:17 PM2017-07-30T18:17:52+5:302017-07-30T18:26:33+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. दिवसभर खडखडीत ऊन पडले होते. ग्रामीण भागात मात्र पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी पावसाची उघडीप राहिली. दिवसभर खडखडीत ऊन पडले होते. ग्रामीण भागात मात्र पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत राहिल्या. शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सकाळी काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या; पण त्यानंतर खडखडीत ऊन राहिले. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी आल्याने धरणाची पाणीपातळी संथगतीने वाढत आहे.
राधानगरी धरण ९८ टक्के भरले असून, सध्या वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद २२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून, सगळ्याच नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत खाली आली असून अकरा बंधारे पाण्याखाली आहेत.
वारणाकाठी सतर्कतेचा इशारा
वारणा धरणक्षेत्रात फारसा पाऊस नसला तरी धरण ८८ टक्के भरल्याने आज, सोमवारपासून प्रतिसेकंद १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकाºयांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणसाठा टी. एम. सी.मध्ये असा -
धरण क्षमता (टीएमसी) सध्याचा साठा टक्केवारी धरणक्षेत्रातील पाऊस
राधानगरी ८.३६१ ८.१६१ ९८ १९
तुळशी ३.४७१ ३.१५६ ९१ ४
वारणा ३४.३९९ ३०.४४१ ८८ १६
दूधगंगा २५.३९३ १९.८६१ ७८ १०
कासारी २.७७४ २.४५१ ८९ १०
कडवी २.५१६ २.५१५ १०० १४
कुंभी २.७१५ २.३५९ ८७ ४८
पाटगाव ३.७१६ ३.०५८ ८२ १५
चिकोत्रा १.५२२ ०.५०१ ३३ १०
चित्री १.८८६ १.४७३ ७८ ५
जंगमहट्टी १.२२४ १.२२४ १०० ५
घटप्रभा १.५६० १.५६० १०० १८
कोदे ०.२१४ ०.२१ १०० ४२