कऱ्हाडचे दहा पोलिस न्यायालयात शरण-

By admin | Published: December 28, 2016 12:19 AM2016-12-28T00:19:01+5:302016-12-28T00:19:01+5:30

-रावसाहेब जाधव खूनप्रकरण पाच दिवसांची पोलिस कोठडी

Karhad's ten-day police custody: | कऱ्हाडचे दहा पोलिस न्यायालयात शरण-

कऱ्हाडचे दहा पोलिस न्यायालयात शरण-

Next

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधव खून प्रकरणातील फरार पोलिस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले. सहायक निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलिसांना गुप्तचर विभागाने अटक केली असून, त्यांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हणमंत लिंगाप्पा काकंडकी, दिलीप मारुती क्षीरसागर, सुधीर सुभाष जाधव, राजकुमार भीमाशंकर कोळी, अतुल संपतराव देशमुख, नितीन चंद्रकांत कदम, सुमित विजय मोहिते, शरद सोमाजी माने, संजय मानाजी काटे, अमोल अर्जुन पवार अशी ‘सीआयडी’ने अटक केलेल्यांची नावे आहेत. खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे २०१६ मध्ये कऱ्हाडमध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस या प्रकरणाचे तपासी अधिकारी होते.
या प्रकरणातील संशयितांबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा कर्मचारी संशयित रावसाहेब जाधवला ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यांनी रावसाहेब जाधवसह अनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडमध्ये आणले. १८ जूनला तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलिस कार्वेनाका चौकीत गेले होते. त्याठिकाणी प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच दिवशी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला.
रावसाहेबचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळा येथील जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला. या जमावाने पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच तहसील कार्यालयावरही आक्रमक (पान १ वरून)
या जमावाने पोलिसांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली. तसेच तहसील कार्यालयावरही आक्रमक मोर्चा काढला. अखेर पोलिस अधीक्षकांनी निरीक्षक विकास धस यांच्यासह बारा पोलिसांना निलंबित केले. तसेच मृत रावसाहेबचा मेहुणा अनिल डिकोळे याच्या फिर्यादीवरून बारा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणातील सर्व पोलिस आरोपी तेव्हापासून फरार होते. ‘सीआयडी’ने संबंधित पोलिसांच्या घरांवर छापा टाकला. तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू केली. याचदरम्यान या प्रकरणात हवालदार कृष्णा खाडे यालाही ‘सीआयडी’ने अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी निरीक्षक धस यांनी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज फेटाळून हणमंत काकंडकी यांच्यासह दहा पोलिसांना २७ डिसेंबरपर्यंत प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी संबंधित दहा पोलिस दुपारी न्यायालयात हजर झाले.

- चौकट
विकास धस यांची न्यायालयात याचिका
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांनी या प्रकरणाच्या फिर्यादीलाच आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर अद्याप सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते.


घटनाक्रम
१८ जून रावसाहेब जाधवचा मृत्यू
१८ जून सीआयडी पथक कऱ्हाडमध्ये
१९ जून शेकडोंचा जमाव पोलिस ठाण्यात
१९ जून कऱ्हाडचे बारा पोलिस निलंबित
२० जून जमावाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
२० जून विकास धस यांच्यासह बाराजणांवर खुनाचा गुन्हा
२१ जून रावसाहेब जाधवच्या मृतदेहावर निंभोरेत अंत्यसंस्कार
२४ जून कऱ्हाडमधील पोलिसांचे जबाब नोंदविले
२७ जून विकास धस यांचा अटकपूर्वसाठी न्यायालयात अर्ज
१६ जुलै हवालदार कृष्णा खाडेला अटक
२० डिसेंबर दहा पोलिसांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
२७ डिसेंबर काकंडकी यांच्यासह दहाजण हजर


दीड तास वकिलांचा युक्तिवाद
सहायक पोलिस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलिस स्वतंत्रपणे न्यायालयाच्या आवारात हजर झाले. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास ते न्यायालयाच्या आवारात एकत्र आले.
तेथून ते सर्वजण एकत्रित प्रथमवर्ग न्यायाधीशांसमोर हजर झाले. त्यानंतर सुमारे दीड तास सरकार पक्षासह बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी ‘सीआयडी’चे अधिकारी एस. एन. जगताप यांच्यासह पथक हजर होते.

Web Title: Karhad's ten-day police custody:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.