कर्मवीर, राजर्षी छत्रपती शाहूराजांमुळे मी घडलो : डॉ. जयसिंगराव पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 01:35 PM2023-10-09T13:35:20+5:302023-10-09T13:41:43+5:30

राजर्षी छत्रपती शाहू् इतिहास संशोधन पुरस्काराने सन्मानित 

Karmaveer, Rajarshi Chhatrapati Shahuraja made me happen says Dr. Jaisingrao Pawar | कर्मवीर, राजर्षी छत्रपती शाहूराजांमुळे मी घडलो : डॉ. जयसिंगराव पवार

कर्मवीर, राजर्षी छत्रपती शाहूराजांमुळे मी घडलो : डॉ. जयसिंगराव पवार

googlenewsNext

कोल्हापूर : मला ज्यांनी घडवले आणि माझ्या जीवनाचे शिल्पकार कर्मवीर भाऊराव पाटील आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे मी घडलो. कर्मवीरांनी माझ्या गावी जर हायस्कूल काढले नसते आणि शाहू महाराजांनी जर वसतिगृह स्थापन केले नसते तर माझ्यासारखा गरीब शेतकऱ्याचा मुलगा शिकला नसता, अशा शब्दांत ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना “राजर्षी छत्रपती शाहू इतिहास संशोधक पुरस्कार” देऊन रविवारी शाहू कॉलेज येथे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी संगीता प्रशांत पाटील होत्या. प्राचार्य विजय नलावडे यांनी मानपत्र वाचन केले.

डॉ. पवार म्हणाले, सातारचा इतिहास केवळ जाज्वल्यच नव्हे तर पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. इतिहास संशोधन मंडळाने सातारच्या इतिहास प्रकाशित करावा. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, इतिहास अभ्यासकांनी संशोधनपर लेखनावर भर द्यावा.

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज आणि सातारा इतिहास संशोधन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने “विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्थित्यंतरे” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात राज्यातील १०० प्रतिनिधी सहभागी झाले. यावेळी सरोजताई पाटील (माई), प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण डॉ. आर. एस. मोरे, प्राचार्य डॉ. ए. एल. बेलवटकर, डॉ. उर्मिला क्षीरसागर, डॉ. अरुणा मोरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम यांनी प्रास्तविक केले. नीलेश वळकुंजे यांनी परिचय करून दिला. सविता माजगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

६६ शोधनिबंध प्रकाशित

“विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्थित्यंतरे” या चर्चासत्रात विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी बीजभाषण केले. अध्यक्षपदी माजी इतिहास विभागप्रमुख डॉ. अरुण भोसले होते. दुपारच्या सत्रात ६६ शोधनिबंध सादर करण्यात आले. डॉ. सुप्रिया खोले यांनी आभार मानले.

Web Title: Karmaveer, Rajarshi Chhatrapati Shahuraja made me happen says Dr. Jaisingrao Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.