‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले चरित्र’ हे इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:05+5:302021-03-19T04:24:05+5:30
कोल्हापूरच्या इतिहासाचे संवर्धन व्हावे कोल्हापूरची कुस्ती, कला, आदी क्षेत्रातील इतिहास नव्या पिढीला सांगण्यासारखा आहे. त्यांच्या संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठ, संशोधकांनी ...
कोल्हापूरच्या इतिहासाचे संवर्धन व्हावे
कोल्हापूरची कुस्ती, कला, आदी क्षेत्रातील इतिहास नव्या पिढीला सांगण्यासारखा आहे. त्यांच्या संवर्धनासाठी शिवाजी विद्यापीठ, संशोधकांनी करावे. त्यासाठी एक अभ्यासगट स्थापन व्हावा. डॉ. विलास आणि छाया पोवार यांचे कार्य इतिहास संवर्धनाला दिशा देणारे आहे. आपण सर्वांनी इतिहासाकडे डोळसपणे पाहण्याची गरज असल्याचे असे ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी सांगितले.
चौकट
नवी प्रेरणा मिळावी
छत्रपती शाहूंच्या विचारांनी समाज जागृत करणाऱ्यांमध्ये डी. आर. भोसले यांचा समावेश होता. या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या कार्यातून तरुणांना नवी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले असल्याचे डॉ. पोवार यांनी सांगितले.
फोटो (१८०३२०२१-कोल-कर्मवीर भोसले पुस्तक) : कोल्हापुरात गुरुवारी शाहू स्मारक भवनात डॉ. विलास पोवार लिखित ‘कर्मवीर रावसाहेब डी. आर. भोसले चरित्र व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून छाया पोवार, बी. डी. खणे, टी. एस. पाटील, विलास पोवार उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)