कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आज बेळगाव दौऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:20 AM2021-06-04T04:20:14+5:302021-06-04T04:20:14+5:30

बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वसामान्य आकाराचे तीन जिल्हे सामावतील इतका हा जिल्हा मोठा आहे. मात्र इतर ...

Karnataka Chief Minister Yeddyurappa to visit Belgaum today | कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आज बेळगाव दौऱ्यावर

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आज बेळगाव दौऱ्यावर

Next

बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. सर्वसामान्य आकाराचे तीन जिल्हे सामावतील इतका हा जिल्हा मोठा आहे. मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्याला सरकारी मदत कमी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यातील आमदार -खासदार हे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांकडे ऑक्सिजन कमतरता, बेड्स आदींपैकी कोणत्या सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

खास करून बीम्स (सिव्हिल) हॉस्पिटलबाबत तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बेळगाव दौरा आयोजित केला आहे. बीम्सचे संचालक डाॅ. विनायक दास्तीकोप्प यांना दोन दिवसांपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या बैठकीस जिल्ह्यातील अकरा आमदारांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आमदारांकडून विशेषता विरोधी पक्षाच्या आमदारांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी मांडल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील बीम्स हॉस्पिटलमधील सावळा गोंधळ पाहता या हॉस्पिटलला एक आयएएस दर्जाचा अधिकारी द्यावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे या बैठकीस माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी उपस्थित राहणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Karnataka Chief Minister Yeddyurappa to visit Belgaum today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.