कर्नाटक- महाराष्ट्र बससेवा ठप्प; वातावरण तणावपूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:43+5:302021-03-14T04:22:43+5:30

गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांचा वाद सुरू आहे. मराठी द्वेषाने उफाळून आलेल्या कन्नड संघटनांनी सीमा भागातील ...

Karnataka-Maharashtra bus service halted; The atmosphere is tense! | कर्नाटक- महाराष्ट्र बससेवा ठप्प; वातावरण तणावपूर्ण !

कर्नाटक- महाराष्ट्र बससेवा ठप्प; वातावरण तणावपूर्ण !

Next

गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांचा वाद सुरू आहे. मराठी द्वेषाने उफाळून आलेल्या कन्नड संघटनांनी सीमा भागातील शांततापूर्ण वातावरण भंग केले असून, अनेक मराठी फलकांवर काळे फासण्याचा प्रकार केला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात पडत असून, कोल्हापूरमधील फलकांवर कन्नड भाषेतील मजकुरावर काळे फासण्यात आले आहे. यावर सी. सोमशेखर यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बस स्थानकावर आंदोलन करत कर्नाटक राज्याची बससेवा बंद केली.

शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कन्नड संघटनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळी कर्नाटकला जाणाऱ्या हुबळी, बेळगाव ,सौंदत्तीसह या बसेस नसल्यामुळे कर्नाटक प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

Web Title: Karnataka-Maharashtra bus service halted; The atmosphere is tense!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.