कर्नाटकचा तांदूळ महाराष्ट्रात विक्रीला
By admin | Published: July 3, 2017 05:38 PM2017-07-03T17:38:49+5:302017-07-03T17:38:49+5:30
लॉरी जप्त, तिघांना अटक : मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
आॅनलाईन लोकमत
बेळगाव, दि. 0३ : कर्नाटक राज्यातील अन्नभाग्य योजनेतील २0 टन तांदूळ महाराष्ट्रात विक्री करण्याचा बेत पोलिसांनी हाणून पाडला. याप्रकरणी एक लॉरी जप्त करण्यात आली असून सोमवारी तीनजणांना अटक करण्यात आली आहे.
य ाप्रकरणी अधिक माहिती अशी, की कर्नाटक राज्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या अन्नभाग्य योजनेतील जवळपास २0 टन तांदूळ महाराष्ट्रात विक्रीसाठी सोमवारी आणला जात होता.
कर्नाटकातील हावेरी येथून सोलापूर येथे हा तांदूळ विक्रीसाठी नेला जात होता. याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचला आणि निपाणी टोल नाक्याजवळ हा तांदूळ वाहून नेणारी लॉरी अडवली. यावेळी या लॉरीत २0 टन तांदूळ आढळला.
हा तांदूळ महाराष्ट्रात विक्रीसाठी नेत असल्याची कबुली संबंधित चालकाने पोलिसांजवळ दिली. याप्रकरणी चालकासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून तांदूळ विक्रीबाबतचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.