श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 07:45 PM2020-11-30T19:45:49+5:302020-11-30T19:47:23+5:30

Religious Places, temple, river, kolhapurnews श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुनानक जयंतीची  सुट्टी असलेने श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला.

Kartik (Tripurari) full moon at Datta temple at Shri Kshetra Nrusinhwadi | श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

googlenewsNext
ठळक मुद्देअसंख्य दिव्याने कृष्णाकाठी मंदिर परिसर उजाळला श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा

प्रशांत कोडणीकर

नृसिंहवाडी - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. गुरुनानक जयंतीची  सुट्टी असलेने श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात भाविकांनी व दत्त देव संस्थानने कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजाळून निघाला.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पौर्णिमा व सुट्टी असलेने हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व कार्तिक पौर्णिमा स्नानासाठी गर्दी केली. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात मंदिर परिसरात दत्त देव संस्थानने व भाविकांनी कृष्णा-पंचगंगा काठावर लावलेल्या असंख्य दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला.

पौर्णिमेनिमित्य येथील मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचा चरणकमलावर महापूजा, तीन वाजता पवमान पंचसूक्त पठण, रात्रो साडे आठ वाजता धूप,दिप, आरती व पालखी सोहळा होवून शेजारती असे कार्यक्रम झाले.

येथील दत्त देव संस्थान मार्फत कापडी मंडप,  दर्शनरांग, मुखदर्शन,पिण्यासाठी शुद्ध पाणी, तसेच कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी ठीक ठिकाणी स्यानिटायझर, थर्मल टेस्ट, सीसी टीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणा, सुरक्षा रक्षक, ब्यारेकेटिंग आदि सोय केली होती.

 दत्त दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविक पायी, दुचाकी, चारचाकी वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत होते. आज कार्तिक स्नान समाप्ती असलेने भाविकांनी व महिलांनी कृष्णा-पंचगंगा नदीच्या काठावर पर्वकाल स्नानाचा लाभ घेतला. सायंकाळी पाच नंतर मुख्य मंदिराच्या दक्षिणोत्तर घाटावरती भाविकानी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्य दिवे लावण्यास सुरवात केली.

भाविकांनी कृष्णा काठची काकडी, वांगी तसेच पेढे, बर्फी,मेवा-मिठाई खरेदी साठी गर्दी केली.रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ चालू होती.ग्रामपंचायत व दत्त देव संस्थान मार्फत भाविक व यात्रेकरुंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या होत्या. पोलिस यंत्रणेकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
  
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कोरोना महामारी मूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने आठ महीने दत्त दर्शनासाठी प्रतीक्षेत असणार्‍या भाविकांनी कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधत श्री दत्त दर्शन घेतले.   भाविकांच्यात जागृतता झ्र कोरोना विषाणू चा प्रसार होवू नये यासाठी काही निर्बंध घालून मंदिर दर्शनास परवानगी मिळालेने भाविकांनी मास्क, सुरक्षित अंतर, स्यानिटायझर याचा वापर करून श्री दत्त दर्शनासाठी हजेरी लावली.

Web Title: Kartik (Tripurari) full moon at Datta temple at Shri Kshetra Nrusinhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.