करवीर पंचायत समिती पुराच्या पाण्यात बुडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:56+5:302021-07-24T04:15:56+5:30
करवीर पंचायत समिती सीपीआर चौकासमोरील जयंती नाल्याच्या शेजारी आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच समितीच्या आवारात पाणी येण्यास सुरुवात झाली. बघता ...
करवीर पंचायत समिती सीपीआर चौकासमोरील जयंती नाल्याच्या शेजारी आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच समितीच्या आवारात पाणी येण्यास सुरुवात झाली. बघता बघता पाण्याची पातळी वाढू लागली, तशी दफ्तर हलविण्याची घाई सुरू झाली. गट विकास अधिकारी जयवंत उगले व सभापती मीनाक्षी पाटील यांनी तातडीने स्वतःची वाहने व काही खासगी वाहने घेऊन हे दफ्तर चालविण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले.
एस. व्ही. साळोखे, मुकुंद शिर्के, विजय टिपुगडे, व्ही. डी. कुरणे, एम. व्ही. स्वामी, विश्वजित पाटील यांनी पुराच्या पाण्यातून दफ्तर सुरक्षितस्थळी बाहेर काढले. सदस्य मोहन पाटील यांनी पंचायतला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सन २०१९ वेळीही पंचायत समिती पुराच्या पाण्यात बुडाली होती.
फोटो:
जयंती नाल्याशेजारी असलेली करवीर पंचायत समिती पुराच्या पाण्यात अशी बुडाली.