शाळा सुरू करण्यात करवीर, पन्हाळा, शिरोळ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:02 PM2020-11-24T12:02:41+5:302020-11-24T12:08:26+5:30

coronavirusunlock, school, educationsector, kolhapurnews शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

Karveer, Panhala, Shirol in the forefront in starting schools | शाळा सुरू करण्यात करवीर, पन्हाळा, शिरोळ आघाडीवर

शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर शहरात अवघ्या दहा शाळा भरल्या संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेला वेग

 कोल्हापूर : शाळा सुरू करण्यात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत करवीर, पन्हाळा आणि शिरोळ तालुका आघाडीवर आहे. कोल्हापूर शहरातील ११२ पैकी अवघ्या १० शाळा भरल्या. विविध शाळांमध्ये पालकांची संमतीपत्रे देण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे.

ग्रामीण भागातील शाळांना शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तयारी करून सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्याला पालक, विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. करवीरमधील ५८, पन्हाळ्यातील ४६, तर शिरोळमधील ३३ शाळा सुरू झाल्या. या तुलनेत शहरातील शाळांना तयारी करूनही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. ज्या दहा शाळा सुरू झाल्या, त्यामध्ये एकूण २८९ विद्यार्थी उपस्थित होते. शाहूपुरीतील वि. स. खांडेकर प्रशालेत विद्यार्थी आले नाहीत.

काही पालक हे शाळा सुरू करण्याबाबतची चौकशी करून गेले. उषाराजे हायस्कूल आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक उपस्थित होते; पण विद्यार्थी नव्हते. पालक हे संमतीपत्रे देण्यासाठी आले होते. सोमवार पेठेतील देशभूषण हायस्कूलमध्ये नववी आणि दहावीचे २० विद्यार्थी आले होते. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी आले नाहीत.

शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाली नसलेल्या शाळांनी विद्यार्थ्यांना कोणत्या दिवशी शाळेत यायचे याबाबत रविवारी कळविले आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांनी शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, आदी शाळांना भेट दिली. शाळा सुरू करण्याच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.

संमतीपत्रे देऊनही पालकांचा नकार

पाल्यांना शाळेत पाठवून देत असल्याची संमतीपत्रे शाळांना दिली आहेत. मात्र, कोरोना संसर्गाची भीती असल्याने सोमवारी पहिल्या दिवशी अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवून देण्यास नकार दिला. काही पालकांनी शाळेने केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली.


तालुकानिहाय आकडेवारी

(शाळा सुरू,  विद्यार्थी  उपस्थिती)
तालुका      शाळा       विद्यार्थी  संख्या

  • करवीर     ५८               २८२५
  • पन्हाळा    ४६              ३५३४
  • शिरोळ      ३३              १७६८
  • चंदगड      ३१              १५०८
  • कागल      ३१              १९७४
  • राधानगरी  २६            २०६२
  • भुदरगड     २१             १३२८
  • हातकणंगले  २१          १०७६
  • शाहूवाडी       २०           १०३८
  • गडहिंग्लज    १०            ४१०
  • गगनबावडा    ९             ५६२
  • आजरा          ५               १९५

Web Title: Karveer, Panhala, Shirol in the forefront in starting schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.