दीपक चव्हाण यांच्या कुटुंबीयांना करवीर पत्रकार संघाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:51+5:302021-08-18T04:28:51+5:30
करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाचगाव येथील दीपक चव्हाण यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली. करवीर ...
करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाचगाव येथील दीपक चव्हाण यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली. करवीर पत्रकार संघाचे सदस्य दीपक चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांना दोन वर्षांची दोन जुळी मुले आणि ६ वर्षाची मुलगी आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे करवीर तालुका पत्रकार संघाने वर्गणी काढून आर्थिक स्वरूपात मदत जमा केली. उमेद फाऊंडेशननेही चव्हाण कुटुंबीयांना संसारोपयोगी साहित्य दिले. जमा झालेली ही सर्व मदत करवीर तालुका पत्रकार संघातील सदस्यांनी व उमेद फाऊंडेशनचे प्रकाश गाताडे यांनी सोमवारी चव्हाण कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. यावेळी करवीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तानाजी पोवार, उपाध्यक्ष उत्तम पाटील, सचिव मच्छिंद्र मगदूम, रमेश पाटील, पवन मोहिते, सुनील ठाणेकर, बाजीराव तळेकर, प्रकाश नलावडे, नामदेव माने, दयानंद जाधव, नीलेश जाधव उपस्थित होते.
फोटो : १७ करवीर पत्रकार मदत
करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दीपक चव्हाण यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली. यावेळी करवीर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.