‘आयटीआय’ला अर्ज करण्यात करवीर तालुका आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:42+5:302021-09-06T04:27:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत असल्याने शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाला दहावी उत्तीर्ण ...

Karveer taluka leads in applying for ITI | ‘आयटीआय’ला अर्ज करण्यात करवीर तालुका आघाडीवर

‘आयटीआय’ला अर्ज करण्यात करवीर तालुका आघाडीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कौशल्यपूर्ण शिक्षण मिळत असल्याने शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाला दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्राध्यान्य देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ‘आयटीआय’ प्रवेशासाठी अर्ज करण्यात करवीर तालुक्यातील विद्यार्थी आघाडीवर आहे. या तालुक्यातील एकूण २१५३ जणांनी अर्ज केले आहेत. पुणे विभागात साडेआठ हजार अर्जांसह कोल्हापूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरोनामुळे रोजगाराभिमुख शिक्षणाचे महत्त्व सर्वांना समजले आहे. त्यामुळे आयटीआय आणि पॉलिटेक्निकमधील अभ्यासक्रमांना प्रवेशित होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत आयटीआय प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ शासकीय आणि ३९ खासगी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि.१५ जुलैपासून सुरू झाली. त्याची मुदत दि.३१ ऑगस्ट रोजी संपली. या मुदतीत एकूण ८५०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील ८३९९ जणांनी अर्ज निश्चिती, तर ७८५० विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांचे प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया नोंदविली आहे.

समाधानकारक चित्र

आयटीआय प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रवेश जागांच्या तुलनेत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे यावर्षीचे प्रमाण समाधानकारक आहे. अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी (दि.४) प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीतील प्रवेशाची प्रक्रिया सोमवार (दि.६) पासून सुरू होणार असल्याचे कळंबा येथील शासकीय आयटीआयचे प्राचार्य आर.एस. मुंडासे यांनी गुरुवारी सांगितले.

‘आयटीआय’ सुरू करण्यास परवानगी

शासकीय आणि खासगी आयटीआय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नोव्हेंबर ते मार्चपर्यंत केवळ चारच महिने प्रशिक्षण झाले. ते अद्याप अपूर्ण राहिले आहे. विद्यार्थ्यांना यंत्रसामग्रीवर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांची अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करत आयटीआय सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

तालुकानिहाय प्रवेश अर्जांची संख्या

करवीर : २१७४

हातकणंगले : १०५०

कागल : ८०५

राधानगरी : ७२५

शिरोळ : ७०२

पन्हाळा : ६३१

गडहिंग्लज : ५७३

भुदरगड : ४७२

चंदगड : ४५८

आजरा : २९३

गगनबावडा : १३५

शाहूवाडी : ४९०

Web Title: Karveer taluka leads in applying for ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.