करवीरमध्ये लसीकरणासाठी झुंबड, लस मात्र नाममात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:10+5:302021-07-05T04:16:10+5:30
कोपार्डे -- करवीर तालुक्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेपैकी केवळ ५३ टक्के जनतेला पहिला डोस मिळाला आहे. तर ४४ ...
कोपार्डे -- करवीर तालुक्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील जनतेपैकी केवळ ५३ टक्के जनतेला पहिला डोस मिळाला आहे. तर ४४ वर्षांखालील जनता लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. लसीकरण केंद्रावर लस आल्याचे समजताच ती मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे.
करवीर तालुक्यात शहर उपनगर व ग्रामीण भागाचा समावेश आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या
५ लाख ४९ हजार आहे. पैकी ४१ टक्के लोकसंख्या १८ ते ४४ वर्ष वयोगटातील आहे.पैकी २ लाख २० हजार ९९० लोकसंख्येपैकी केवळ २ हजार ३० लोकांनाच लसीचा पहिला डोस मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या वयोगटातील कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने लसीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडत आहे.
लसीकरणाचा पहिला डोस देण्यासाठी ४५ वर्षांवरील वयोगटाला प्राधान्य देण्यात आले होते. पण लसीच्या तुटवड्याने पहिला डोस देताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे ४५ ते ६० च्या वयोगटातील १ लाख २८ हजार ३५१ लोक संख्या आहे. पैकी ६७ हजार १७० लोकसंखेला पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे. तर ६० वर्षावरील ७४ हजार ५९८ लोकसंख्येपैकी ४० हजार लसीकरण झाले आहे.
पहिला डोसचे लसीकरण लक्षात घेता ४५ वर्षांवरील लोकसंख्येच्या केवळ ५३ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे तर १८ ते ४४ वयोगटातील २ लाख १८ हजार ९६० लोकसंख्या तर ४५ च्या पुढील वयोगटातील ९५ हजार २७९ अशी ३ लाख १४ हजार २३९ लोकसंख्या आजही कोरोना लसीकरणापासून वंचित आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने लसीकरणासाठी झुंबड उडत आहे
करवीर तालुक्यातील कोरोना लसीकरणाचा लेखाजोखा
एकूण लोकसंख्या -५ लाख ४९ हजार
वयोगट -- १८ ते ४४ पात्र -- २ लाख २० हजार ९९० पहिला डोस -- २ हजार ३०
दुसरा डोस -- -------
एकही डोस न मिळालेले --२ लाख १८ हजार ९६० वयोगट -- ४५ ते ६० पात्र -- १ लाख २८ हजार ३५१ पहिला डोस -- ६७ हजार १७० दुसरा डोस -- २४ हजार ६६० एकही डोस न मिळालेले -- ६१ हजार १८१
वयोगट ६० वर्षांवरील पात्र -- ७४ हजार ५९८ पहिला डोस -- ४० हजार ५११ दुसरा डोस -- १० हजार ५९७ एकही डोस न मिळालेले -- ३४ हजार १४७
फोटो
कोपार्डे (ता. करवीर) येथील प्राथमिक शाळेत लसीकरणासाठी एकच झुंबड उडाली होती