अंदाजपत्रकातील फुगीर वाढीबाबत कार्यासन मिलीभगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:25 AM2021-04-01T04:25:44+5:302021-04-01T04:25:44+5:30

नगरसेवक शशांक बावचकर लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील ३२.७६ कोटींची फुगीर वाढ ही पालिकेला आणखीन आर्थिक संकटात ...

Karyasan colludes on fugitive growth in the budget | अंदाजपत्रकातील फुगीर वाढीबाबत कार्यासन मिलीभगत

अंदाजपत्रकातील फुगीर वाढीबाबत कार्यासन मिलीभगत

Next

नगरसेवक शशांक बावचकर

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : नगरपालिकेच्या अंदाजपत्रकातील ३२.७६ कोटींची फुगीर वाढ ही पालिकेला आणखीन आर्थिक संकटात टाकणारी आहे. त्यामुळे बेशिस्तपणाला लगाम घालणे आवश्यक असताना कार्यासन ११ विभागाकडून गैरकारभाराला पाठबळ दिले जात आहे, असा आरोप नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. या निर्णयाविरोधात नगरपरिषद प्रशासन विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

नगरपालिकेच्या २६ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात ३२.७६ कोटींचे उत्पन्नवाढीच्या बाजूला फुगीर दाखविण्यात आले आहे. हा विषय बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. त्याला ३०८ कलमानुसार स्थगिती मागितली होती. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनीही स्थगितीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. परंतु तो फेटाळण्यात आल्याने जिल्हा कार्यासन ११ व पालिकेतील कारभारी यांच्या संगनमताने नगरपालिकेची आर्थिक स्थिती गंभीर असतानाही असा निर्णय घेतला असल्याची टीका केली आहे.

Web Title: Karyasan colludes on fugitive growth in the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.