कस्तुरी सावेकर पोहोचली ‘कॅॅम्प तीन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:57+5:302021-05-25T04:28:57+5:30
गेल्या तीन दिवसांपासून तिने कॅॅम्पच्या चढाईस सुरुवात केली आहे. या मोहिमेत तिच्यासमवेत गिर्यारोहक दिनेश कोटकर, जितेंद्र गवारे यांच्यासह एकूण ...
गेल्या तीन दिवसांपासून तिने कॅॅम्पच्या चढाईस सुरुवात केली आहे. या मोहिमेत तिच्यासमवेत गिर्यारोहक दिनेश कोटकर, जितेंद्र गवारे यांच्यासह एकूण १२ जण आहेत. कस्तुरी हिने सोमवारी पहाटे पाच वाजता २१३०० फूट उंचीच्या कॅॅम्प दोन येथून चढाई सुरू केली. त्यावेळी प्रचंड वारा आणि बर्फवृष्टी सुरू होती. त्यामुळे तिचा चढाईचा वेग मंदावला. बर्फवृष्टी कमी झाल्यानंतर तिचा वेग वाढला. दुपारी साडेतीन वाजता ती कॅॅम्प तीनवर सुखरूपपणे पोहोचली. वारा, बर्फसृष्टीमुळे तिला कॅॅम्प तीनवर पोहोचण्यास विलंब लागला. या कॅॅम्पवर ती रात्री मुक्काम करणार आहे. तेथून मंगळवारी पहाटे पाचच्यासुमारास ती सुमारे २६ हजार फूट उंचीच्या कॅॅम्प चारच्यादिशेने निघणार आहे. त्याठिकाणी दुपारी दोनच्यासुमारास पोहोचल्यानंतर तीन ते चार तास विश्रांती घेऊन सायंकाळी सात वाजता अंतिम चढाईला सुरुवात करणार आहे. बुधवारी सकाळी ६ ते ८ यावेळेत ती एव्हरेस्टच्या माथ्यावर पोहोचणार असल्याची माहिती तिचे वडील दीपक सावेकर यांनी दिली.
चौकट
कृत्रिम ऑक्सिजन लावून चढाई
कॅॅम्प तीनवरून कस्तुरी हिची कॅॅम्प चारपर्यंतची आणि तेथून पुढील अंतिम चढाई आता कृत्रिम ऑक्सिजन लावून होणार आहे. या कॅॅम्पवरील विश्रांतीदेखील तिला या स्वरूपातील ऑक्सिजन लावूनच घ्यावी लागणार आहे.
फोटो (२४०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर (गिर्यारोहक)
===Photopath===
240521\24kol_11_24052021_5.jpg
===Caption===
फोटो (२४०५२०२१-कोल-कस्तुरी सावेकर (गिर्यारोहक)