महाराष्ट्र केसरीसाठी कौतुक, पृथ्वीराज, अरुण, शुभम यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:40+5:302021-02-23T04:39:40+5:30

कोल्हापूर : पुणे येथे होणाऱ्या संभाव्य राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्हा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्र ...

Kautuk, Prithviraj, Arun, Shubham selected for Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीसाठी कौतुक, पृथ्वीराज, अरुण, शुभम यांची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी कौतुक, पृथ्वीराज, अरुण, शुभम यांची निवड

Next

कोल्हापूर : पुणे येथे होणाऱ्या संभाव्य राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्हा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्र केसरीसाठी कौतुक डाफळे, पृथ्वीराज पाटील, अरुण बोंगार्डे, शुभम शिरनाळे यांची निवड झाली.

मोतिबाग तालीम येथे झालेल्या निवड चाचणीत गादी व माती गटातील निवडी अनुक्रमे अशा : १७ किलो - महेश पाटील (आमशी), रमेश इंगवले (आनुर), अनिकेत पाटील (आमशी), अक्षय ढेरे (एकोंडी). ६१ किलो- संतोष परीट (बानगे), विजय पाटील (पासार्डे), भरत पाटील (सोनगे), सरदार पाटील (राशिवडे). ६५ किलो- सौरभ पाटील (राशिवडे), प्रताप पाटील (कोतोली), सात्ताप्पा हिरुगडे (बानगे), नितीन कांबळे (राशिवडे). ७० किलो - अक्षय हिरुगडे (बानगे), किशोर पाटील (राशिवडे), सोनबा गोंगाणे (निगवे खालसा), माणिक कारंडे ( सावर्डे दुमाला). ७४ किलो - स्वप्निल पाटील (वाकरे), हर्षद दानोळे (इंगळी), अनिल चव्हाण, प्रवीण पाटील (चाफोडी). ७९ किलो- भगतसिंग खोत (माळवाडी), राकेश तांबुळकर (पाचाकटेवाडी), किरण पाटील (इस्पुर्ली), गणेश डेळेकर (कुरुंदवाड). ८६ किलो- अतुल हावरे (बानगे), किरण मोरे (कोगे), हृदयनाथ पाचाकटे (पाचाकटेवाडी), शुभम पाटील (कोगे). ९२ किलो- सुशांत तांबुळकर (पाचाकटेवाडी), यश माने (वाकरे), बाबासाहेब रानगे (आरे), मोहन पाटील (मौजे सांगाव). ९७ किलो- कृष्णात कांबळे (दर्याचे वडगाव), सानिकेत राऊत (पडळ), शशिकांत बोंगार्डे (बानगे), श्रीमंत भोसले (मिणचे).

महाराष्ट्र केसरी गटासाठी ८६ ते १२५ किलो- कौतुक डाफळे (पिंपळगाव), पृथ्वीराज पाटील ( देवठाणे), अरुण बोंगार्डे (बानगे), शुभम शिरनाळे (दत्तवाड) यांचा समावेश आहे.

यावेळी हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी विनोद चौगुले, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, महापौर केसरी अमृता भोसले, गुंडाजी पाटील, अशोक पोवार, संतोष कामत आदी उपस्थित होते.

निवड चाचणीसाठी पंच म्हणून संभाजी पाटील, राजाराम चौगले, प्रकाश खोत आदींनी कामकाज पाहिले.

Web Title: Kautuk, Prithviraj, Arun, Shubham selected for Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.