मुदत संपल्याने कवाळे यांचा स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 05:56 PM2020-08-10T17:56:54+5:302020-08-10T17:57:58+5:30
राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे संदीप कवाळे यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला. पुढील काही महिन्यांसाठी हे पद राष्ट्रवादीकडे आहे. अजित राऊत, सचिन पाटील या पदासाठी इच्छुक आहेत.
दरम्यान, महापालिकेची नगरसचिव सुनील बिद्रे यांनी रिक्त जागेसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. ते आज मंगळवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पत्र पाठविणार आहेत.
कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आघाडीनुसार पदांचे वाटप निश्चित केले आहे. स्थायी समिती सभापतिपद वर्षभर राष्ट्रवादीकडे आहे. मागील स्थायी समिती सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीतून सचिन पाटील आणि संदीप कवाळे हे इच्छुक होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी कवाळे यांना पहिल्या सहा महिन्यांसाठी संधी दिली. उर्वरित सहा महिन्यांसाठी पाटील यांना पदाची संधी देऊ, अशी ग्वाही दिली होती.
कवाळे यांची पक्षातील तडजोडीनुसार १० मे रोजी मुदत संपली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निवडणूक प्रक्रिया होणार नाही अशी चिन्हे होती. त्यामुळे त्यांनीही ही राजीनामा दिला नाही. आठ दिवसांपूर्वी नेते मुश्रीफ यांनी कवाळे यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवार झालेल्या स्थायी समितीच्या सभेत कवाळे महापालिका प्रशासनाकडे सभापतिपदाचा राजीनामा दिला.