kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:43 PM2021-12-02T17:43:46+5:302021-12-02T17:45:23+5:30

जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

kdcc bank election Janata Dal's Swati Kori files application | kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल

kdcc bank election : जनता दलाच्या स्वाती कोरी यांचा अर्ज दाखल

googlenewsNext

गडहिंग्लज : जिल्हा बँकेतील महिला राखीव गटासाठी जनता दलाचे माजी आमदार अॅड.श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा.स्वाती महेश कोरी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, सुनील शिंदे, नगरसेवक नितीन देसाई , नरेंद्र भद्रापूर, सुनीता पाटील, शकुंतला हातरोटे,शशीकला पाटील,नाज खलिफा,व उदय कदम, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी कुणाकडून..?

विधानपरिषद निवडणुकीत जनता दलाने पालकमंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा दिला होता. परंतु, जिल्हा बँकेसाठी 'जद'ने नगराध्यक्षा प्रा.कोरी यांचा अर्ज स्वतंत्रपणे दाखल केला आहे. दरम्यान प्रा.कोरी यांनी आपल्या आघाडीकडून निवडणूक लढवावी यासाठी आमदार विनय कोरे व महाडीक यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्या कुणाकडून लढणार याची उत्सुकता आहे.

अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, गणपतराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी आतापर्यत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्याच्याही हालचाली सुरु आहेत. मात्र येत्या काही दिवसातच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

Web Title: kdcc bank election Janata Dal's Swati Kori files application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.