Kdcc Bank Election : संचालकपदी आमदार पी.एन.पाटील, राजेश पाटील यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 02:44 PM2021-12-21T14:44:32+5:302021-12-21T14:45:23+5:30

जिल्हा बँकेत सत्तारुढ आघाडीतील चार नेत्यांची निवड बिनविरोध झाली.

Kdcc Bank Election Unopposed election of MLAs PN Patil and Rajesh Patil as Directors | Kdcc Bank Election : संचालकपदी आमदार पी.एन.पाटील, राजेश पाटील यांची बिनविरोध निवड

Kdcc Bank Election : संचालकपदी आमदार पी.एन.पाटील, राजेश पाटील यांची बिनविरोध निवड

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठोपाठ आता आमदार पी.एन.पाटील व राजेश पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर जिल्हा बँकेत सत्तारुढ आघाडीतील चार नेत्यांची निवड बिनविरोध झाली.

आमदार पी. एन. पाटील यांची यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. पाटील यांनी करवीर विकास संस्था गटातून अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात दादासाहेब लाड, राहुल पाटील यांचा अर्ज होता. आज विरोधी दोघांनीही अर्ज मागे घेतला. पी. एन. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच करवीरसह्य जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी व त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुका विकास संस्था गटातून अर्ज दाखल केला होता. या गटातून त्यांच्यासह मोहन संतू परब असे दोघांचेचे अर्ज होते. आज दुपारी परब यांनी माघार घेतल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. आमदार पाटील यांचे वडील व माजी आमदार कै. नगरसिंगराव पाटील हे या गटातून बँकेत संचालक होते. कै. पाटील यांच्या अकाली निधनाने रिक्त झाल्यानंतर त्या जागेवर आमदार पाटील यांना स्विकृत्त संचालक म्हणून घेण्यात आले होते.

Web Title: Kdcc Bank Election Unopposed election of MLAs PN Patil and Rajesh Patil as Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.