kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 12:09 PM2022-01-07T12:09:17+5:302022-01-07T12:09:51+5:30

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले.

kdcc bank result Opposition Shiv Sena MP Sanjay Mandlik and Babasaheb Patil Asurlekar won from the process group | kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

googlenewsNext

कोल्हापूर : प्रक्रीया गटातून विरोधी शिवसेना आघाडीचे खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी एकतर्फी विजय मिळवत सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का दिला. या गटातील उमेदवारीवरुनच जिल्हा बॅंकेच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना ब्रेक लागून निवडणूक लागली होती. 

या अटीतटीच्या लढतीत खासदार मंडलिक यांना ३०६ तर आसुर्लेकर यांना ३२९ मते पडली. सत्तारुढ गटाचे प्रदीप पाटील भूयेकर व मदन कारंडे यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना अनुक्रमे ११९ व १२२ मते मिळाली.

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. त्यांनी तेथूनही विजय खेचून आणला. 

दरम्यान आसुर्लेंकर व मंडलिक हे पॅनेलमध्ये असावेत अशी सत्तारुढची शेवटपर्यंत भूमिका राहिली, पण ते कोरेच्या दबावापुढे शक्य झाले नाही. यातूनच स्वतंत्र पॅनेल केले गेले, याला सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची निवडणूकीत चर्चा होती. निकालादिवशी त्याचे प्रत्यंतर आले.

Web Title: kdcc bank result Opposition Shiv Sena MP Sanjay Mandlik and Babasaheb Patil Asurlekar won from the process group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.