‘केडीसीसी’चा बिगुल वाजला

By admin | Published: March 28, 2015 12:26 AM2015-03-28T00:26:54+5:302015-03-28T00:27:15+5:30

५ मे रोजी मतदान : ४ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात

'KDCC' is a bugle | ‘केडीसीसी’चा बिगुल वाजला

‘केडीसीसी’चा बिगुल वाजला

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी (केडीसीसी) ५ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी शुक्रवारी नियुक्ती केली. जिल्हास्तरीय संस्थांच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सहकार विभागातील अधिकाऱ्याची वर्णी लावली आहे. जिल्हा बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी बॅँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक अधिकारी नियुक्तीसाठी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार डॉ. कदम यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा बॅँकांच्या निवडणुका या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असा प्रयत्न होता; पण प्राधिकरणाने सहकारातील अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमही प्राधिकरणाने तयार केला असून, ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत अर्ज दाखलची मुदत असून, ९ एप्रिलला अर्जांची छाननी आहे. ११ ते २४ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. तसेच ५ मे रोजी मतदान तर ६ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.


जिल्हा बँकांसाठी केंद्रीय पद्धती
केंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील पात्र जिल्हा बॅँकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम एकत्रित लावला आहे. राज्यातील १८ जिल्हा बॅँकांचा मतदार यादीचा कार्यक्रम एकाच दिवशी सुरू केला होता. आता मतदानही एकाच दिवशी घेतले जाणार आहे.


निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीचे पत्र अद्याप मिळालेले नाही. पत्र मिळताच प्राधिकरणाच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
- डॉ. महेश कदम

Web Title: 'KDCC' is a bugle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.