केदार साळुंखे याला ‘भारत भूषण पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:03+5:302021-04-09T04:25:03+5:30
केदार याला चेन्नईच्या डिओसेस ऑफ अशियाने अॅथलेटिक्समध्ये डॉक्टरेट प्रदान केली आहे. डिओसेस युनिव्हर्सिटी ऑफ युनिटीने त्याची निवड ‘युनिव्हर्सल ॲबॅसडर ...
केदार याला चेन्नईच्या डिओसेस ऑफ अशियाने अॅथलेटिक्समध्ये डॉक्टरेट प्रदान केली आहे. डिओसेस युनिव्हर्सिटी ऑफ युनिटीने त्याची निवड ‘युनिव्हर्सल ॲबॅसडर कल्चरल’ म्हणून केली होती. सन २०१८ मध्ये पुणे येथे सर्वांत दीर्घ पल्ल्याची सोलो स्केटिंग मॅरेथॉन करणारा सर्वांत लहानवयीन स्केटर ठरला. उत्तर प्रदेश वर्ल्ड रेकॉर्डसद्वारे दिला जाणारा इंटरनॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२१ (स्केटिंग व क्रीडा विभाग) त्याने पटकावला आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंद आहेत. त्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, चिल्ड्रन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्, आशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्डस्, आदींचा समावेश आहे. स्केटिंगमध्ये आठ, तर सायकलिंगमध्ये सहा विक्रम प्रस्थापित केले आहेत.
फोटो (०८०४२०२१-कोल-केदार साळुंखे)
रक्तदान शिबिरात ७५ जणांचा सहभाग
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यावर शरद नलवडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी रक्तदान शिबिर घेतले. त्यामध्ये ७५ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या शिबिरासाठी अजिंक्य मित्र मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी शीतल नलवडे, शैलेश नलवडे, राहुल चौधरी, अंकुश शिंदे, संजय नलवडे, सनी हिलगे, नेहा साळोखे, अमित राणे, सुनील निकम,अजय चौगुले, आदी उपस्थित होते.
===Photopath===
080421\08kol_1_08042021_5.jpg
===Caption===
फोटो (०८०४२०२१-कोल-केदार साळुंखे)