कोल्हापूरच्या तरुणाईने केला केदारकंठा सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 03:45 PM2021-01-28T15:45:51+5:302021-01-28T15:51:41+5:30

fort kolhapur - तापमान उणे १० अंश डिग्री सेल्सियस, स्नो फॉल, बर्फाळ प्रदेशातील अस्वलांची भीती, हजार फूट चढाई ८० डिग्रीमध्ये करावी लागते अशा आव्हानांना तोंड देत कोल्हापुरातील राहुल मेस्त्री, योगेश चौगुले व रोहित चौगुले या तरुणाईने उत्तराखंडमधील केदारकंठा ही अत्यंत जोखमीची १२ हजार ५०० फुट उंचीचा ट्रेक पूर्ण केला आहे.

Kedarkantha Sir by the youth of Kolhapur | कोल्हापूरच्या तरुणाईने केला केदारकंठा सर

 कोल्हापुरातील योगेश चौगुले, राहुल मेस्त्री व रोहित चौगुले या तरुणांनी उत्तराखंडमधील केदारकंठा ही जोखमीची ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केली.

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापूरच्या तरुणाईने केला केदारकंठा सर खडतर प्रवास : उणे १० अंश डिग्री तापमानात काढले आठ दिवस

कोल्हापूर : तापमान उणे १० अंश डिग्री सेल्सियस, स्नो फॉल, बर्फाळ प्रदेशातील अस्वलांची भीती, हजार फूट चढाई ८० डिग्रीमध्ये करावी लागते अशा आव्हानांना तोंड देत कोल्हापुरातील राहुल मेस्त्री, योगेश चौगुले व रोहित चौगुले या तरुणाईने उत्तराखंडमधील केदारकंठा ही अत्यंत जोखमीची १२ हजार ५०० फुट उंचीचा ट्रेक पूर्ण केला आहे.

राहुल मेस्त्री याचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय आहे. योगेश यांची बॉक्स बनवायची फॅक्टरी तर रोहित यांचे हॉटेल आहे. या तिघांनी १७ तारखेला कोल्हापुरातून प्रवासाला सुरुवात केली. डेहराडूनवरून संकरी गावात पोहोचले. या गावापासून पुढे ट्रेकला सुरुवात होते. चढायला तीन दिवस आणि उतरायला तीन दिवस आणि प्रवास असा एकूण आठ दिवसांचा कालावधी. संपूर्ण परिसर बर्फाळ असल्याने कधिही स्नो फॉल सुरू होतो.

रात्री उणे १० डिग्री सेल्सिअस इतके तापमान असते. शिवाय अस्वलांची भीती, बर्फ पडू लागला की झोपतो तो टेंटदेखील बर्फाच्या ओझ्याने पडले याची भीती , मग प्रत्येकाने आळीपाळीने काही तासांसाठी जागरण करायचे आणि टेंटवर बर्फ साचू द्यायचा नाही. पहारा ठेवायचा. यादरम्यान दिवसादेखील समोरचे दृश्य दिसत नाही अशा पद्धतीने व्हाइट आउट होतो.

या काळातला प्रवास अधिक धोकादायक. अशी ही अत्यंत जोखमीची ट्रेक या तरुणाईने यशस्वीपणे सर केली आहे. या समीर पॉइंटवरून हरकी धून, स्वर्गरोहिणी असे पीक पॉइंटदेखील दिसतात. इंडिया हाईकस संस्थेतर्फे यांनी ही ट्रेक पूर्ण केली आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी वाटेत पडलेला कचरा गोळा करत त्याचे वर्गीकरण करून पुनर्वापरासाठीच्या प्रक्रियेलाही पाठविण्यात आले.
 

Web Title: Kedarkantha Sir by the youth of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.