मुलांना सोशल मीडिया गेम्सपासून दूर ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:18+5:302021-01-10T04:18:18+5:30
श्री.ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिर येथे चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन इचलकरंजी : आजच्या पिढीला ज्ञानाबरोबर सुसंस्काराची गरज आहे. यासाठी ...
श्री.ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिर येथे चिल्ड्रन हेल्थ पार्कचे उद्घाटन
इचलकरंजी : आजच्या पिढीला ज्ञानाबरोबर सुसंस्काराची गरज आहे. यासाठी पालकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. आज ई-लर्निंग, ऑनलाईन शिक्षण येत असताना मुलांच्या हाती मोबाईल येत आहेत. अशावेळी ती मुले सोशल मीडियाच्या व गेम्सच्या आहारी जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घ्यावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले.
श्री. ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिर येथे लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी व लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यामार्फत चिल्ड्रन हेल्थ पार्कची उभारणी करण्यात आली. त्याचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन हरीष बोहरा यांचे उपस्थित झाले.
गायकवाड यांनी ना. बा. एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एस. आर. पाटील यांनी लायन्स क्लबच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. लायन्स क्लब इचलकरंजी सिटीचे अध्यक्ष आर. बी. व्यास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास गावभागचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, संस्थेचे व्हा. चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, बाबासाहेब वडिंगे, विश्वस्त ॲड. सत्यनारायण ओझा, लक्ष्मीकांत पटेल, महेक बांंदवलकर, अशोक जोशी, तसेच लायन्स क्लबच्या रमा बोहरा, जयश्री पाटील, आदी मान्यवर व लायन्स मेंबर्स, पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. एस. ए. कांबळे यांनी आभार मानले. प्रा. युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
( फोटो ओळी) इचलकरंजीत श्री. ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिर येथे लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सिटी व लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यामार्फत चिल्ड्रन हेल्थ पार्कची उभारणी करण्यात आली. त्याचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या हस्ते व संस्थेचे चेअरमन हरीष बोहरा यांचे उपस्थित झाले.