परराज्यातून येणाऱ्यांना अलगीकरण केंद्रात ठेवा -: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:21 PM2020-04-30T18:21:14+5:302020-04-30T18:22:41+5:30

 नियोजन युध्दपातळीवर सुरू ठेवून गावामार्फत त्यांच्या जेवणाचीही सोय करावी लागेल. अशा सर्व व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर्स त्यांची यादी तयार करून नियोजन करावे. अशा लोकांमध्ये लक्षण आढळल्यास त्यांचा स्वॅब ग्रामीणआरोग्य केंद्रामधून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे

Keep immigrants at the segregation center | परराज्यातून येणाऱ्यांना अलगीकरण केंद्रात ठेवा -: जिल्हाधिकारी

परराज्यातून येणाऱ्यांना अलगीकरण केंद्रात ठेवा -: जिल्हाधिकारी

Next
ठळक मुद्दे कोव्हिड केअर, हेल्थ आणि रूग्णालयाच्या 40 टक्के सुविधा 15 मे पर्यंत करा--जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये व्यक्ती येण्याची शक्यता आहे. त्यांना गावातील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवावे. त्याचबरोबर कोव्हिड केअर, कोविड हेल्थ आणि कोव्हिड रूग्णालय या त्रिस्तरीययंत्रणेसाठी अंदाजित संसर्गीत रुग्णांच्या संख्येनुसार 15 मे पर्यंत 40 टक्के सुविधा पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी जिल्हाधिका?्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा समन्वयक संजय शिंदे, महसूलचे उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, भू-संपादन अधिकारी हेमंत निकम, प्रांताधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी . देसाई यावेळी म्हणाले, परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरीत कामगार, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी, विद्यार्थी आणि इतर त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याबाबत राज्य शासनाकडून आजच आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने बाहेरून व्यक्ती येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासाठी किमान 50 लोकांसाठी संस्थात्मक अलगीकरण कक्षाची व्यवस्था ग्रामस्तरावर करण्याचे नियोजन करा. अशा केंद्रांमधील व्यक्तीचा गावातील व्यक्तीशी संपर्क येणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्या. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींची स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल, वस्तीवरील घरांमध्ये सोय असेल तर अशा ठिकाणी त्यांना होम क्वारंटाईन करा. मुख्यत्वे गावाच्या गावठाण भागात व्यक्तीची स्वतंत्र राहण्याची सोय नसल्यास अशा व्यक्तींना पहिले 14 दिवस अलगीकरण केंद्रात ठेवावे. जेणेकरुन गावठाणातील नागरिक जर अशा व्यक्तीस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, असे निदर्शनास असे तर सुरक्षित राहतील व संसर्ग गावात पसरणार नाही. 

 नियोजन युध्दपातळीवर सुरू ठेवून गावामार्फत त्यांच्या जेवणाचीही सोय करावी लागेल. अशा सर्व व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी ग्रामीण भागातील खासगी डॉक्टर्स त्यांची यादी तयार करून नियोजन करावे. अशा लोकांमध्ये लक्षण आढळल्यास त्यांचा स्वॅब ग्रामीणआरोग्य केंद्रामधून घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. गावपातळीवरील यंत्रणा तयार असली पाहीजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 50 वर्षांपुढील नागरिकांचे आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांच्यामार्फत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, आपल्या जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जाणा?्या व्यक्तींची जिल्हावार, राज्यवार याद्या तयार कराव्यात.


थर्मल स्कॅनरचा वापर करा- अमन मित्तल
थर्मल स्कॅनरचा वापर करून कार्यालयात येणा?्या कर्मचा?्यांचे तपमान तपासावे. जादा तपमान असल्यास त्यांना घरी पाठवावे, कार्यालयात प्रवेश देवू नये, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, आवश्यक त्या सेवा सुरू ठेवा. गावातील रस्ते कायमस्वरूपी बंद करू नयेत. मान्सूनपूर्व कामांमध्ये पाणीटंचाईबाबत तसेच एमजीनरेगाची कामे सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावे. उद्योगांना परवानगी मिळाल्याने त्यादृष्टिने गावांमध्ये हालचाली वाढतील, त्याबाबत योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Keep immigrants at the segregation center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.