कीप इट अप...फास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:30 AM2019-01-07T00:30:06+5:302019-01-07T00:30:10+5:30
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी रस्त्यांत उभारून अनेकांकडून ‘कीप इट अप..., फास्ट’ असे प्रोत्साहन ...
कोल्हापूर : ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी रस्त्यांत उभारून अनेकांकडून ‘कीप इट अप..., फास्ट’ असे प्रोत्साहन दिले जात होते. स्पर्धकांकडूनही दोन्हीही हात उंचावून उपस्थितांच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद दिला जात होता.
सकाळी सव्वासहा वाजल्यानंतर पितळी गणपती, धैर्यप्रसाद हॉल परिसर, सर्किट हाऊस, ताराराणी चौक, उड्डाणपूल, आदी मार्गांसह शिवाजी विद्यापीठ परिसर मार्गावर लाल टी-शर्टवर ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील स्पर्धक धावत होते. मार्गावर चौका-चौकांसह फूटपाथवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकजण हाताचा अंगठा दाखवून ‘कीप इट अप...’ असे उच्चारून प्रोत्साहन देत होते. धावमार्गावर टप्प्याटप्प्यांवर अनेकजण स्पर्धकांना स्वत:हून पाणी देत होते.
अनेक लहान मुले, वृद्ध तितक्याच उत्साहाने स्पर्धेत सहभागी झाल्याचे दिसत होते. वृद्धांचा सहभाग तरुणाईला लाजविणारा होता. लहान मुलांना स्पर्धेत प्रोत्साहन देताना आई-वडील, पालकही रनमध्ये सहभागी झाले होते.
दिव्यांग संतोष रांजगणे
यांचेही कौतुक
दिव्यांग असणाºया संतोष रांजगणे यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी तितक्याच उत्साहाने व्हील चेअरवरून सुमारे
१० कि.मी.ची रन तितक्याच चपळतेने पूर्ण केली. त्यांना मार्गावर ठिकठिकाणी अनेकांनी ‘कीप इट अप, संतोष’ असे उच्चारून प्रोत्साहन दिले. त्यावेळी त्यांनीही तितक्याच उत्साहाने हात उंचावून त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्यामुळे दिव्यांग संतोष रांजगणे यांच्या जिगरबाजीची चर्चा संपूर्ण मॅरेथॉनमध्ये रंगली होती.