महानगरपालिकेचे मैदानांची स्वच्छता ठेवावी
By admin | Published: April 6, 2017 03:49 PM2017-04-06T15:49:11+5:302017-04-06T15:49:11+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस क्र्रीडा सेलची महापौराकडे मागणी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील मैदांनाची व व्यायामशाळांची खूप दुरवस्था झाली आहे. यांची स्वच्छता करून या ठिकाणी ग्राऊंडमनची नेमणूक करून व्यायामशाळेच्या स्थितीत सुधारणा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने महापौर हसिना फरास यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत व महापालिकेच्या मालकीच्या एकूण १४ व्यायाम शाळा आहेत. त्यापैकी दहा व्यायाम शाळा बंद अवस्थेत आहेत. चार व्यायाम शाळा लोक वर्गणीतून (व्यायामाला येणाऱ्यांकडून) चालू आहेत. त्या व्यवस्थित चालण्यासाठी व्यायामशाळेतील त्रुटी पाहून त्या दूर कराव्यात व पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने चालू कराव्यात, सर्व व्यायामशाळामध्ये प्रशिक्षक नेमावेत, जेथे नाईट वॉचमन नाहीत तेथे ते नेमावेत, अशी मागणी केली आहे.
अशीच परिस्थिती मैदानांचीही आहे. मैदानावर गवत कापण्याचा ठेका दिलेले ठेकेदार गवत कापतात व आपली जनावरे मैदानावर सोडतात, त्यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे, यासह शहरातील अनेक बागेत नेमलेला वॉचमन जागेवर नसतो, तसेच या ठिकाणी मद्यपी मोठ्या नासधुस करतात, अशा मागण्या केल्या आहेत.
याप्रंसगी क्रीडा सेलचे अध्यक्ष सुहास साळोखे, कार्याध्यक्ष अनिल कदम, युवराज साळोखे, प्रज्योत पाटील, निलेश येझरे, डी.एस.केसरकर, सचिन लोहार, शुंभम मांगुरे, मुकूंद दळवी, चेतन साळोखे, विजय पाटील, शाम पोवार, आनंदराव पाटील, शारदा चेट्टी आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलतर्फे महानगरपालिकेच्या हद्दीतील मैदाने व व्यायामशाळेच्या दुरवस्थेबाबत महापौर हसीना फरास यांना निवेदन देताना सुहास साळोखे यांनी निवेदन दिले. यावेळी आदील फरास, अनिल कदम व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.