मसाई पठारावर रंगीबेरंगी नैसर्गिक रानफुलांची मुक्त ऊधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 02:21 PM2019-09-28T14:21:22+5:302019-09-28T14:26:52+5:30

कोल्हापुर पासुन ३५ कि.मि.वर असणाऱ्या मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन विवीध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत. मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु असुन निसर्गनिर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर गर्दी होवु लागली आहे. 

Keep natural flowers precious on the Masai Plateau | मसाई पठारावर रंगीबेरंगी नैसर्गिक रानफुलांची मुक्त ऊधळण

मसाई पठारावर रंगीबेरंगी नैसर्गिक रानफुलांची मुक्त ऊधळण

googlenewsNext
ठळक मुद्देमसाई पठारावर नैसर्गिक फुलांचा अनमोल ठेवा        पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर लक्ष

नितीन भगवान    

पन्हाळा - मसाई पठारावर रंगीबेरंगी रान फुलांची मुक्त ऊधळण सुरु झाली असुन निसर्गनिर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहाण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मसाई पठारावर गर्दी होवु लागली आहे. 

मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन विवीध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत विस्तीर्ण अशा हिरव्या गवताच्या गालीच्यावर फुललेली सफेद मुसळी ( क्लोरोफायटम), सोनकी (सेनीसीओ), केना (कमेलोना), कापरु (बिओनीआ), मंजीरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीन), निलवंती ( सायनोटीस), सितेची आसव (युट्रीक्युलेरीया), सफेद गोंद (इरिओकोलास), निलीमा (ॲनीलीमा), कंदीलफुल (सिरोपोनीया), दिपकाडी (डिपकडी), या शिवाय रान कोथींबीर, रानहळद, जंगली सुरण, तेरडा या औषधी वनस्पती पहावयास मिळतात.   

मसाई पठारवर वर जाताना अग्निशीखा अर्थात कळलावीची फुले व शतावरीचे वेल या औषधी वेलीं पहावयास मिळतात पठारावर एकाच जातीच्या पण यात विवीध प्रकार असलेल्या फुलांपैकी स्मीथीया म्हणजे पिवळी फुले याच्या पठारावर उगवणाऱ्या नऊ जाती आहेत. या सर्वच जाती मसाई पठारावर ऊगवतात.

यातील सर्वात मोठे फुल ऊगवणाऱ्या वनस्पतीवरील पिवळ्या फुलावरील पाकळीवर दोन लहान तांबडे ठिपके असतात. यालाच मिकीमाऊसची फुले असे म्हणाले जाते. समुहाने वाढणारी ही फुले या ठिकाणच्या पाणथळ परीसरात आहेत. यात प्रामुख्याने सफेद मुसळी, निळीची राइत, भुई आमरी (ग्राउंडआर्केड) काळीमुसळी (कुरकीलगो), सफेदगेंद ही तर चेंडुच्या आकाराची लहान फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुनच घेतात. याच्या पण दहा जाती आहेत. यातील पठारावर गोलगेंद, तारागेंद, पानगेंद या जाती प्रामुख्याने दिसतात.    

कोल्हापुर पासुन ३५ कि.मि.वर असणारे मसाई पठार त्याच्या पायथ्थाशी असणाऱ्या ॲडव्हेंचर पार्क मुळे पर्यटकांचे लक्ष वेधुन घेवु लागले आहे. जैव विवीधतेने नटलेल्या या ऐतिहासिक, पौराणीक, व खगोलअभ्यासकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महतीबरोबरच नैसर्गिक फुलांमुळे वेगळी ओळख निर्माण होवु लागली आहे.   

    निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष  मधुकर बाचुळकर म्हणाले की, उत्तर पश्चीम घाटातील बहुतेक पठारावर नैसर्गिक फुलांचा हंगाम पावसाळ्यानंतर तीन महीने पहावयास मिळतो. पण मसाई पठारावरील बेसाल्ट ट्राईट खडक हा पाऊस, वारा यांच्या मुळे झिज पावुन त्यावर हलक्या प्रमाणात मातीचा थर निर्माण होतो. यावर ही नैसर्गिक फुलांची बाग तयार होते या बेसाल्टच्या खडकाकडे मानवाचे लक्ष गेल्याने यातील खनीजे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु झाले आहे, या कडे आपण सर्वांनीच वेळीच लक्ष दिले तर ही जैवविवीधता पुढच्या अनेक पिढ्या ही नैसर्गिफुलांचि बाग अनुभवत राहतील.         
 

Web Title: Keep natural flowers precious on the Masai Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.