शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी एकदिलाने कार्यरत राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:47+5:302021-03-18T04:23:47+5:30

विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रिये समारोपाप्रसंगी झालेल्या ‘एक्झिट मीटिंग’मध्ये ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. ...

Keep working for the progress of Shivaji University | शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी एकदिलाने कार्यरत राहा

शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी एकदिलाने कार्यरत राहा

Next

विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रिये समारोपाप्रसंगी झालेल्या ‘एक्झिट मीटिंग’मध्ये ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह समिती सदस्य प्रमुख उपस्थित होते. गेल्या तीन दिवसांत विद्यापीठातील सर्वच घटकांमध्ये एक अनोखा उत्साह आणि मिळून काम करण्याची ऊर्जा सर्वत्र जाणवत राहिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम उल्लेखनीय होता. एकात्मतेने आपण विद्यापीठाला उंचीवर घेऊन जाल, असा विश्वास प्रा. शर्मा यांनी व्यक्त केला. नॅक समिती सदस्यांनी विविध सूचना केल्या आहेत. त्यांचा विद्यापीठ निश्चितपणाने पाठपुरावा करून अमलात आणेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. या बैठकीत प्रा. शर्मा यांनी ‘नॅक’ला सादर केल्या जाणाऱ्या गोपनीय अहवालाची प्रत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, नॅक पिअर समितीचे सदस्य प्रा. बी. आर. कौशल, एस. ए. एच. मोईनुद्दिन, तरुण अरोरा, सुनील कुमार, हरिश चंद्रा दास उपस्थित होते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट -

प्राध्यापकांच्या रिक्त जागांची पूर्तता करा

संशोधन, शिक्षण, विद्यार्थ्यांसाठीचे विविध उपक्रम, आदी क्षेत्रातील विद्यापीठाची वाटचाल चांगली आहे. प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे अध्यापनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यापीठाने या रिक्त जागा भरण्याबाबतची पूर्तता करावी, अशी सूचना प्रा. शर्मा यांनी केली. दरम्यान, त्यांनी कुलगुरूंकडे सुपूर्द केलेला गोपनीय अहवाल मूल्यांकन आणि काही सुधारणांबाबतच्या सूचना अशा दोन विभागांमध्ये आहे. हा अहवाल ‘नॅक’कडून मूल्यांकन जाहीर झाल्यानंतर विद्यापीठाकडून पाहण्यात येणार आहे.

फोटो (१७०३२०२१-कोल-नॅक समिती) : कोल्हापुरात बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या ‘नॅक’च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाचा गोपनीय अहवाल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे नॅक पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे. पी. शर्मा यांनी सुपूर्द केले. यावेळी डावीकडून आर. के. कामत, बी. आर. कौशल, हरिश चंद्रा दास, सुनील कुमार, तरुण अरोरा, पी. एस. पाटील, एस. ए. एच. मोईनुद्दीन, एम. एस. देशमुख उपस्थित होते.

Web Title: Keep working for the progress of Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.