गुणवंत विद्यार्थी निर्माणासाठी कार्यरत राहावे

By admin | Published: November 18, 2014 10:35 PM2014-11-18T22:35:59+5:302014-11-18T23:33:42+5:30

जी. डी. यादव : शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा वर्धापनदिन साजरा; गुणवंतांचा सत्कार

Keep working for quality students | गुणवंत विद्यार्थी निर्माणासाठी कार्यरत राहावे

गुणवंत विद्यार्थी निर्माणासाठी कार्यरत राहावे

Next

कोल्हापूर : जगात गुणवत्तेला पर्याय नाही आणि असे गुणवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने कार्यरत राहावे. नवीन ज्ञानाची निर्मिर्ती हा कोणत्याही विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू असतो आणि त्याची पूर्तता शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आणि माजी विद्यार्र्थी या चार प्रमुख स्तंभांच्या सक्षमतेवर अवलंबून असते. या चार स्तंभांची एकत्र सांगड घातल्यास विद्यापीठाची वाटचाल योग्य प्रकारे होते, असे प्रतिपादन माटुंगा (मुंबई) येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांनी आज, मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. विद्यापीठाच्या राजर्र्षी शाहू सभागृहात बोलताना यादव म्हणाले, ज्या विद्यापीठात शिक्षक उत्कृष्ट काम करीत असतात, ज्ञानसंपन्न असतात, त्यांचा लौकिक वृद्धिंगत होतो. अशा ठिकाणी उत्कृष्ट विद्यार्र्थी निर्माण होण्याची शक्यता वाढते. उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट विद्यार्र्थी हे दोन्ही घटक एकमेकांकडून सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा करतात आणि दर्जा वृद्धिंगत होतो. विद्यापीठामधील संशोधन हे लोकाभिमुख असलेच पाहिजे.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाने आदर्श प्रथा व परंपरा जोपासत असतानाच ग्रामीणतेचा न्यूनगंड मात्र झुगारून दिला आहे. एकविसाव्या शतकातील विद्यापीठाची वाटचाल आता ही वैश्विकतेकडे होते आहे. विद्यापीठाच्या पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा कृतिशील आराखडा आम्ही तयार केला असून, त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे.
प्रा. यादव यांच्या हस्ते विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या गुणवत्ताधारक पाल्यांचाही विद्यापीठ प्रशासकीय व कल्याण निधी पारितोषिके देऊन गुणगौरव केला. प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पारितोषिके देऊन गौरविले.
दरम्यान, आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. पवार व प्रा. यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. बीसीयूडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

यांचा झाला सत्कार
विद्यापीठातील गुणवंत शिक्षक प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक डॉ. शैलजा माने (सहयोगी प्राध्यापक, कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे, जि. सातारा), बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अशोक हजारे (कॉलेज आॅफ फार्मर्सी, मोरेवाडी, जि. कोल्हापूर), प्राचार्य सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शिक्षिका डॉ. प्रज्ञा घोरपडे (आटर्स अ‍ॅँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव), विद्यापीठातील गुणवंत सेवक रमेश गवळी (अधीक्षक), सुरेखा आडके (वरिष्ठ सहायक), आनंदा वारके (शिपाई), महाविद्यालयीन गुणवंत सेवक संतोष गायकवाड (मुख्य लिपिक, बाळासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी).

Web Title: Keep working for quality students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.