विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्यरत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:38 AM2020-12-13T04:38:07+5:302020-12-13T04:38:07+5:30
म्हाकवे : शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य शिक्षकांच्या हाती आहे. तुम्ही शिक्षण विभाग आणि विद्यार्थ्यांमधील दूत आहात. सहनशीलता, सौजन्य, नम्रता हे ...
म्हाकवे : शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य शिक्षकांच्या हाती आहे. तुम्ही शिक्षण विभाग आणि विद्यार्थ्यांमधील दूत आहात. सहनशीलता, सौजन्य, नम्रता हे सद्गुण अंगी बाणावेत. ज्ञानमंदिरांतील विद्यार्थी हाच देव आहेत त्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहा, असे आवाहन कागलचे गटशिक्षणाधिकारी डाॅ. जी. बी. कमळकर यांनी केले.
बानगे (ता. कागल) येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटना यांच्यावतीने शिष्यवृत्ती, नवोदय, प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भविष्य निर्वाह निधी पावतीचे वाटप करण्यात आले. संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जुनी पेन्शनचे राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार, संदीप पाडळकर, जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष नेताजी कमलकर, मुख्याध्यापक महादेव नलवडे, तालुकाध्यक्ष गजानन कुंभार यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी विस्तार अधिकारी गावडे, सरचिटणीस चंद्रकांत शितोळे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वप्निल सांगले, विठ्ठल पाटील यांनी केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.
१२ बानगे पेन्शन
कँप्शन बानगे येथे राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांच्यावतीने भविष्य निर्वाह निधी पावतींचे वितरण करताना जी. बी. कमळकर. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दत्ता पाटील, म्हाकवे