संघाच्या पैशांवर डोळा ठेवून विरोधक एकवटले - एस. डी. लाड; मुख्याध्यापकांना स्वास्थ्य देण्यासाठी संघ कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:50 PM2017-12-22T21:50:59+5:302017-12-22T21:54:49+5:30

कोल्हापूर : संस्थेच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणारे लोक संघाचे काय नेतृत्व करणार? कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या या निवडणुकीत केवळ संघाच्या पैशांवर डोळा ठेवून

Keeping an eye on the money of the team, D. Lad; The team is working for the health of the principals | संघाच्या पैशांवर डोळा ठेवून विरोधक एकवटले - एस. डी. लाड; मुख्याध्यापकांना स्वास्थ्य देण्यासाठी संघ कार्यरत

संघाच्या पैशांवर डोळा ठेवून विरोधक एकवटले - एस. डी. लाड; मुख्याध्यापकांना स्वास्थ्य देण्यासाठी संघ कार्यरत

Next
ठळक मुद्देगडहिंग्लज येथे इमारतीसाठी जागा खरेदी केली आहे. शासनाच्या शिक्षणविरोधी भूमिकेला विरोध करून

कोल्हापूर : संस्थेच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणारे लोक संघाचे काय नेतृत्व करणार? कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या या निवडणुकीत केवळ संघाच्या पैशांवर डोळा ठेवून विरोधकांची टोळी एकत्र आली आहे. शासनाच्या शिक्षणविरोधी भूमिकेला विरोध करून मुख्याध्यापकांना स्वास्थ्य देण्याचे काम आम्ही संघाच्या माध्यमातून करीत आहोत. ते अधिक ताकदीने करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीमध्ये आम्ही लढत असल्याचे छत्रपती शाहू सत्तारूढ आघाडीचे मार्गदर्शक आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

विरोधकांनी केलेल्या आरोप-टीकेला उत्तर देताना सत्तारूढ आघाडीचे मार्गदर्शक एस. डी. लाड म्हणाले, ऋषितुल्य असणाºया डी. बी. पाटील यांच्यावर एका बाजूला आरोप करायचे आणि दुसºया बाजूला त्यांच्याबद्दल नाटकी आदर दाखवायचा. जे स्वत:च्या शाळेच्या मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूक देतात, ते जिल्'ातील मुख्याध्यापकांना काय सन्मान देणार? पतसंस्थेचे उमेदवार निवडताना तुम्ही कुणाला विचारता घेता? मग मुख्याध्यापक संघाचे उमेदवार निवडताना तुम्हाला विचारण्याची गरज काय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदर्शवत मुख्याध्यापक संघाची पाचमजली स्वमालकीची इमारत आहे. ग्रामीण भागातील महिला, मुलींसाठी २१ खोल्यांचे महिला वसतिगृह आहे. त्यासह गडहिंग्लज येथे इमारतीसाठी जागा खरेदी केली आहे.

निधी साठविला होता, म्हणून हे शक्य झाले, याचे भान ठेवून आरोप करावा. शाळांच्या विविध समस्येसाठी वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने करण्यामध्ये संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ अग्रेसर आहे. त्यामुळे यावेळी निवडणुकीत केवळ संघाच्या पैशांवर डोळा ठेवून विरोधकांची टोळी एकत्र आली आहे. त्याला कोल्हापूर जिल्'ातील सुज्ञ मुख्याध्यापक उत्तर दिल्याखेरीज राहणार नाहीत.

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, दि न्यू एज्युकेशन सोसायटी, विक्रम एज्युकेशन सोसायटी, खेडूत शिक्षण संस्था (चंदगड), कागल एज्युकेशन सोसायटी, विद्या प्रसारक मंडळ, गडहिंग्लज, हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, जय हनुमान शिक्षण संस्था, बेलवळे खुर्द; ताराराणी विद्यापीठ, आजरा महल शिक्षण संस्था, ग्रामविकास शिक्षण परिषद, नागनाथ शिक्षण संस्था,आदी संस्थासह जिल्'ातील अन्य लहान-मोठ्या शिक्षणसंस्था, मुख्याध्यापक संघाचे आजी-माजी पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना, मान्यवर छत्रपती शाहू सत्तारूढ आघाडीच्या पाठीशी आहेत. शासनाच्या शिक्षणविरोधी भूमिकेला विरोध करून मुख्याध्यापकांना स्वास्थ्य देण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक संघाचा कारभार सुरू असल्याने या त्रैवार्षिक निवडणुकीत आमचे सत्तारूढ पॅनेल निश्चितपणे बाजी मारील.

आलिशान वाहने कोठून येतात?
ज्यांना स्वत:च्या शाळा चालविता येत नाहीत, शाळेसाठी पुरेशी इमारत बांधता येत नाही, फर्निचर नाही, त्यांना मुख्याध्यापक संघाची इमारत आणि फर्निचरवर बोलण्याचा अधिकार काय? ज्यांचा पगार वेळेवर होत नाही, अशा नेतृत्व करणाºयांकडे आलिशान वाहने कोठून येतात? असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.
.................................................................................................
आरोप चुकीचे, निराधार
संघाचे बांधकाम आणि सर्व आर्थिक व्यवहार संचालकांच्या बैठकीमध्ये मंजूर झाले आहेत. यानंतर सर्वसाधारण सभेला मंजुरी घेऊन सीएमार्फत आॅडिट झालेले आहे, असे असताना होणारे आरोप हे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहेत, असे एस. डी. लाड यांनी स्पष्ट केले.
..........................................................................................................
आम्ही हे करणार
* शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध लढा तीव्र करणार.
* शाळा, मुख्याध्यापकांचे प्रश्न गतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.
* चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांसाठी स्वतंत्र इमारत बांधकाम करणार.
* शाळांची बांधणी मजबूत करणार, प्रशासनात गतिमानता आणणार.
* विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
..........................................................................................
फोटो (२२१२२०१७-कोल-एस डी लाड (मुख्याध्यापक संघ)

 

Web Title: Keeping an eye on the money of the team, D. Lad; The team is working for the health of the principals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.