Lok Sabha Election 2019 ‘ध्यानात ठेवून’ आज शरद पवार बोलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:30 AM2019-04-17T00:30:10+5:302019-04-17T00:30:26+5:30

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ...

With 'keeping in mind' Sharad Pawar will talk today | Lok Sabha Election 2019 ‘ध्यानात ठेवून’ आज शरद पवार बोलणार

Lok Sabha Election 2019 ‘ध्यानात ठेवून’ आज शरद पवार बोलणार

Next

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ आज, बुधवारी सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होत आहे. परवाच्या दौऱ्यात त्यांनी सतेज पाटील यांच्या ‘आमचं ठरलंय’ यावर ‘तुमचं ठरलंय, तर आम्हीबी ध्यानात ठेवलंय’ असे उत्तर देऊन इशारा दिला होता. त्यामुळे आजच्या सभेत पवार ‘ध्यानात ठेवून’च बोलणार असल्याने सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पाचव्यांदा कोल्हापुरात येत आहेत. धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी ते आज सायंकाळी पुण्याहून थेट कोल्हापुरात येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता गांधी मैदानात सभेला मार्गदर्शन करणार आहेत. आतापर्यंत कॉँगेसचा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील एकही नेता कोल्हापुरात प्रचारासाठी आलेला नाही; पण आजच्या सभेला काँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल येणार आहेत.
पाचव्यांदा कोल्हापुरात : निवडणूक गांभीर्याने
कोल्हापूर : स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असतानाही उमेदवारी दिल्याने राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यापासून आतापर्यंत ते पाचवेळा कोल्हापुरात आले आहेत. मागील निवडणुकांचा अंदाज घेतला तर पवार यांनी फार तर एखादी सभा आणि एकवेळा गाठीभेटीचा कार्यक्रम घेतला होता. मागील, २०१४ च्या निवडणुकीत राष्टÑवादी व कॉँग्रेसमधून महाडिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रह राहिला. सतेज पाटील यांची नाराजी होती; पण ती दूर करून एकसंधपणे दोन्ही कॉँग्रेसचे नेते राबले; त्यामुळे देशात मोदी लाट असतानाही धनंजय महाडिक हे कोल्हापुरात ती परतवून लावण्यात यशस्वी झाले. पाच वर्षांनंतर बºयाच घडामोडी घडल्या. राजकीय सोय म्हणून प्रत्येक वेळेला महादेवराव महाडिक भूमिका घेत गेले आणि त्यांच्यासोबत धनंजय महाडिक यांनाही जाणे क्रमप्राप्त राहिले; त्यामुळे इतर पक्षांतील कार्यकर्ते दुखावलेच; पण राष्टÑवादीचे नेते व कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले. त्यातूनच महाडिक यांच्या उमेदवारीला शेवटपर्यंत विरोध झाला. विरोधाचे वातावरण निवळेल, असा अंदाज होता; पण तसे न झाल्याने पवार यांनी दुरुस्त्यांसाठी जोरदार प्रयत्न केले. मुंबईत एक-दोन बैठका घेतल्या, त्याचबरोबर निवडणुकीच्या अगोदर गडहिंग्लज येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांंशी शासकीय विश्रामगृहात संवाद साधला. त्यानंतर वातावरण सुधारत नाही म्हटल्यानंतर दोन्ही कॉँग्रेससह मित्रपक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांचा रामकृष्ण हॉल येथे मेळावा घेतला. मुक्कामास राहून त्यांनी अनेक जोडण्या लावल्या. ७ एप्रिलला कोल्हापुरात आले होते. दोन दिवस ते मुक्कामास राहिले. ‘कोल्हापूर’ मतदारसंघात कोण काय करतो, काय परिस्थिती आहे, याची रोज माहिती त्यांच्यापर्यंत पुरविणारी यंत्रणा कार्यरत आहे. पक्षांतर्गत विरोध असताना आपण उमेदवारी दिल्याने दगाफटका होऊ नये म्हणून ते सतर्क आहेत.

Web Title: With 'keeping in mind' Sharad Pawar will talk today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.