केळोशीचा लोंढा- नाला प्रकल्प तुडूंब, तुळशी भरण्यास होणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 02:48 PM2021-07-15T14:48:44+5:302021-07-15T14:51:58+5:30

Rain Dam Kolhapur- गेल्या चार दिवसापासून तुळशीसह धामणी परिसराला पावसाने हजेरी लावली आहे .आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी तुडुंब भरला .

Keloshi Londha- Nala Project Tudumb | केळोशीचा लोंढा- नाला प्रकल्प तुडूंब, तुळशी भरण्यास होणार मदत

केळोशी ( ता. राधानगरी ) येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून अतिरीक्त होणारे पाणी तुळशी जलाशयात मिसळत आहे . (छाया -श्रीकांत ऱ्हायकर )

googlenewsNext
ठळक मुद्देकेळोशीचा लोंढा- नाला प्रकल्प तुडूंब, तुळशी भरण्यास होणार मदतअतिरीक्त पाणी उजव्या सांडव्यातून थेट तुळशी जलाशयात

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड-गेल्या चार दिवसापासून तुळशीसह धामणी परिसराला पावसाने हजेरी लावली आहे .आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी तुडुंब भरला .

सद्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून अतिरिक्त पाणी या कालव्याद्वारे थेट तुळशी जलाशयात मिसळत आहे .परिणामी तुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असुन तुळशी धरण भरण्यास मदत होणार आहे .

बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर तारण्या पावसाच्या नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे . परिसरात चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे . गेल्या कित्येक दिवसापासून पावसा अभावी खेळंबलेली रोप लागणीची कामे वेग घेत आहेत .

केळोशी प्रकल्पाचे अतिरीक्त पाणी तुळशीस तलावात मिसळत असल्याने तुळीशीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणारआहे . चार दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने अर्धवट भरलेला हा प्रकल्प आज सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरला. येथील बैलगोंड ओढयावर हा प्रकल्प अस्तित्वात आला असून या प्रकल्पामुळे केळोशी, जाधववाडी , सुतारवडी, वळवंटवाडी , कुंभारवाडी , कुरणेवाडी , देऊळवाडीसह छोटया -मोठया वाडया -वस्त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

तुळशी धरण परिसरात २४ तासात ५७मी .मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे . धरणात सद्या ४७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे .गतसाली आज आखेर धरण परिसरात ९५३ मी . मी . इतका पाऊस नोंदवला होता .चालू वर्षी यात वाढ होऊन हा आकडा ११६९ मी मी . इतका झाला आहे . पण पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी गतसाल पेक्षा धरणात यावर्षी ३टक्के पाणी कमी असल्याचे जानवते आहे.



 

Web Title: Keloshi Londha- Nala Project Tudumb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.