Kerala Floods : देवभूमी केरळसाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:54 PM2018-09-03T17:54:01+5:302018-09-03T17:56:20+5:30
केरळ बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : केरळ राज्यावर १६ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने ४४ हून अधिक नद्यांच्या पाणी अनेक गावात व शहरात घुसले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन अनेकजण बेघर झाले.
येथील बांधवासाठी मदतीसाठी कोल्हापूरकारांच्यावतीने सिध्दीगिरी मठ, व्हाईट आर्मीचे जवान यांच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात आली,अशी माहिती रेस्क्यू अॅन्ड रिलीफ चिफ उज्वल नागेशकर व व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागेशकर म्हणाले, केरळ येथील अपत्तीवर मात करण्यासाठी कोल्हापूरातील सर्व बांधवानी, सामाजिक संस्थानी वेगवेगळ््या स्वरुपात मदती दिली. यामध्ये अन्नधान्य कपडे, ब्लॅकेट, औषधे, भांडी, जणावरांचे पेंड, चारा आदी मदतीसह ट्रक्स व अॅम्बुलन्स सेवा देण्यात आली.
यासह एक लाख साडी व २७ लाखांची औषधे आमच्याकडे जमा झाली होती. या सर्व वस्तूंचे योग्य प्रकारे नियोजन करून केरळ येथील ज्या ठिकाणी कमी प्रमाणात मदत पोहचली होती. त्या ठिकाणी पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरलो.
अशोक रोकडे म्हणाले, पहिली रेस्क्यू टिम १८आॅगस्टला कोल्हापूरातून रवाना झाली. १९ आॅगस्टला आलप्पी जिल्हयातील कायमकुलम या शहरात रेस्क्यू अॅन्ड रिलीफ चीफ उज्वल नागेश्करांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांसाठी तात्काळ औषधोपचाराची व रिलीफ सेंटरला सुरुवात करण्यात आली.
वैद्यकीय पथकापासून अनेक स्वयंसेवक येथून त्या मदत कार्यामध्ये सहभागी होत होते. गरजेप्रमाणे औधषेअन्नधान्य, कपडे,पुस्तके, जीवनापयोगी वस्तू पुरविल्या जात होत्या.
या उपक्रमात १०० हून अधिक स्वयंसेवकांची टीम यामध्ये १५ डॉक्टरांची टिम, प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त गावात जावून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत होते. अॅम्ब्यूलन्स, ट्रक, मोठे डंपर अशी दहा वहाने २५० कि.मी परिघात वेगवेगळ््या स्वरुपात कार्यरत होती. यामध्ये घरांची - देवळांची स्वच्छता बचावकार्य, मदतकार्य, वैद्यकीय सुविधा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक पारस ओसवाल, व्हाईट आर्मीचे जवान उपस्थित होते.