खाटांगळेत भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 06:49 PM2017-07-30T18:49:49+5:302017-07-30T18:51:05+5:30
कोल्हापूर : खाटांगळे (ता. करवीर) येथे भुरट्या चोरट्यांनी गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला आहे. किराणा दुकानातील रोकड ते दुचाकीतील पेट्रोल चोरण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. नोकरी नाही, की घरातून पैसे दिले जात नाहीत; परंतु व्यसनाच्या आहारी आणि ऐशारामात जगण्याची शरीराला लागलेली सवय सहजासहजी बंद करता येत नाही. त्यामुळे काही टोळक्यांकडून या चोºया केल्या जात असल्याची चर्चा आहे. या भुरट्या चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

तीन ते चार हजार लोकवस्ती असलेले खाटांगळे गाव सधन आहे. येथील एका किराणा दुकानाच्या छतावरील कौले काढून चोरट्यांनी रोकड चोरुन नेण्याचा प्रयत्न पाच ते सहावेळा केला आहे. नेहमीप्रमाणे दुकानमालक रविवारी (दि. ३०) सकाळी सातच्या सुमारास दुकानात आले असता पाठीमागील दरवाजा उघडा असल्याचे दिसले, तर पोटमाळ्यावरील छतावरील कौले बाजूला सरकलेली दिसली. दुकानातील किरकोळ स्वरूपातील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी दूध संस्थेसह एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचा बंगला फोडून चोरी झाली होती.
घरासमोर, पार्किंग केलेल्या मोटारसायकलच्या पेट्रोल टाक्या रातोरात रिकाम्या केल्या जात आहेत. पैसा कमविण्याची अक्कल नाही, घरांतून पैसे दिले जात नाहीत, तर आपलं चालणार कसं म्हणून काही टोळक्यांनी चोरीचा सपाटा लावला आहे. स्वत:च्या गाडीत चोरीचे पेट्रोल घालून दुसºयांना कमी दरात विकत देण्यामध्येही ते माहीर आहेत. दमडीही न मिळविता किमती पोशाख, डोळ्यावर गॉगल व दिमतीला मोटारसायकल अशा रुबाबात नेहमी तोंडात मावा किंवा गुटखा चघळत बिनदिक्कतपणे चोरटे फिरत असल्याची चर्चा आहे.
नागरिकांना कामाच्या ठिकाणी मोटारसायकलवरून जावे लागते. त्यामुळे त्यांना नेहमी गाडीमध्ये पुरेसे पेट्रोल ठेवावे लागते. बहुतांशी लोक पगार झाला की, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलची टाकी फुल्ल करतात. हे चोरट्यांना चांगलेच माहीत असते. आपल्या गल्लीत कोण राहते. कोणाच्या मोटारसायकलीमध्ये पेट्रोलचा साठा जास्त असतो. गाडी फुल्ल केली की, त्या रात्री टाकी रिकामी करण्यासाठी ते दिवसभर फिल्डिंग लावतात. रात्री सर्वजण झोपलेत का याचा अंदाज घेतात. मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास सर्वत्र स्मशान शांतता असते अशावेळी हे टोळके चोºया करते.