कर्मचारी भविष्य निधीतर्फे खानोलकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:23 PM2020-08-18T12:23:22+5:302020-08-18T12:24:12+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वाधिक दावे निकाली काढल्याबद्दल कर्मचारी भविष्य निधीच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात कार्यरत असणारे मूळचे कोल्हापूरचे कक्ष पर्यवेक्षक धनंजय खानोलकर यांचा पुणे विभागीय भविष्य निधी आयुक्त अरुणकुमार यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
खानोलकर यांनी पुणे हे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असतानाही विशेष परवानगी घेऊन ८ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२० या कालावधीत सर्वाधिक ८ हजार ५१२ दावे निकाली काढले. त्यातून लाखो रुपयांची मदत गरजू नागरिकांना मदत झाली. या कार्याची दखल घेऊन भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत खानोलकर यांचा प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.