खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ
By Admin | Published: May 8, 2017 12:55 AM2017-05-08T00:55:37+5:302017-05-08T00:55:37+5:30
खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा लवकर संपलेला हंगाम, रब्बीच्या वाढलेल्या क्षेत्राचा एकंदरीत परिणाम म्हणून यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. भात, खरीप ज्वारीच्या क्षेत्रात वाढ दिसत नसली तरी भुईमूग, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात कमालीची वाढ दिसत आहे.
गत हंगामात पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र घटले. खरिपाचे २ लाख ५७ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र १ लाख ४१ हजार ९०० हेक्टर होते. यामध्ये ९ हजार आडसाली, ३५ हजार पूर्वहंगामी, तर ३९ हजार सुरूची लागण होती. जवळपास ५८ हजार हेक्टरवर खोडवा पीक होते. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा कारखाने तीन-साडेतीन महिनेच चालले. हंगाम लवकर संपल्याने रब्बीचे क्षेत्र वाढले. रब्बी काढल्याने आता त्या जमिनी खरिपाखाली आल्या आहेत. कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी १ लाख ११ हजार ३०० हेक्टरचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. गतवर्षीपेक्षा नऊ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यामध्ये भुईमूग १६०० हेक्टर, सोयाबीन २४००, तूर १४००, मूग ७००, उडीद १७००, तर नागलीचे ८०० हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. भाताचे १ लाख १० हजार तर खरीप ज्वारीचे ४० हजार हेक्टर क्षेत्र मात्र कायम आहे. उसाच्या क्षेत्रातही फारसा बदल झाला नसून, १ लाख ४१ हजार हेक्टरवर उभा ऊस आहे.
दृष्टिक्षेपात खरीप हंगाम
प्रमुख पिकेसर्वसाधारण क्षेत्रउद्दिष्ट हेक्टर
भात१,०८,000१,१०,000
ज्वारी७,२००४,000
नागली२१,४००२२,५००
मका२,८००३,५००
तुर२,५००३000
मुग२,३००२, ७००
उडीद२,५०० ३,५००
भुईमूग५२,१००५३,७००
सोयाबीन५१,७००५६,000
ऊस१,४२,३००१,४१,९००